नियोजित वंदेमातरम् सभागृहाशेजारी हज हाऊस उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार एम. एम. शेख यांनी संध्याकाळी उशिरा या संदर्भात बोलताना दिली.
मोकळ्या नियोजित जागेवर वंदेमातरम् सभागृह, तर अतिक्रमणे दूर करून त्याच्या शेजारी हज हाऊस उभारण्यात येणार आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने एक महिन्याचा वेळ मागितला. तो त्यांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचेही आमदार शेख यांनी सांगितले. दरम्यान, शहरात हज हाऊसला जागा मिळाल्याचे वृत्त समजताच विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. शहरातील मिल कॉर्नर येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.