मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोलापूर येथील भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. मराठवाडय़ात ठिकठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटले. नांदेडमध्ये आंदोलनास हिंसक वळण मिळून एक बस जाळण्यात आली. इतरत्रही बसवर दगडफेक झाली. या दरम्यान, संध्याकाळी राज ठाकरे यांचे शहरात आगमन झाले. क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. रात्री ठाकरेंचा शहरात मुक्काम होता.
वाळूज येथे सकाळपासूनच मनसे कार्यकर्ते ठाकरे यांच्या स्वागताच्या तयारीत होते. शहरातील चौकांमध्ये मोठय़ा होर्डिगसह मनसेचे झेंडे लावण्यात आले. स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. जालना येथील सभेची जय्यत तयारी सुरू असून मराठवाडय़ातील या घटनांविषयी ते या सभेत प्रतिक्रिया व्यक्त करतील, असे सांगितले जाते. संघटनात्मक पातळीवरही कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत.
हिंगोलीत बाराजण अटकेत
हिंगोलीच्या आमच्या वार्ताहराने कळविल्यानुसार, राष्ट्रवादीचे नेते शिवाजी माने, माजी खासदार विलास गुंडेवार, आमदार जयप्रकाश दांडेगावकर व नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या घरावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दगडफेक केली. या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काँग्रेस व मनसेच्या संगनमताने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरावर हल्ले होत असल्याचा आरोप शिवाजी माने यांनी केला. हिंगोलीत सातजणांना, तर वसमतमध्ये पाचजणांना पोलिसांनी अटक केली. विश्रामगृहावर झेंडे लावून व्यासपीठ तयार करणे अवैध असल्याने त्याचीही तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पोलिसांच्या पाठबळामुळेच मनसेचे कार्यकर्ते दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.उस्मानाबाद येथे मनसे कार्यकर्त्यांनी नगर येथील गाडीवर दगडफेक करण्याच्या घटनेचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2013 रोजी प्रकाशित
राज ठाकरे शहरात दाखल
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोलापूर येथील भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. मराठवाडय़ात ठिकठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटले. नांदेडमध्ये आंदोलनास हिंसक वळण मिळून एक बस जाळण्यात आली.
First published on: 28-02-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackrey in city