महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपुडी येथे मनसेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या जनावरांच्या छावणीस शनिवारी भेट दिली. सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे शाळेत एखादा शिक्षक रजेवर असताना ऑफ पिरियडवर आलेल्या शिक्षकासारखेच आहेत. त्यामुळे दुष्काळ व अन्य गोष्टींची त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करणार? असा टोला लगावतानाच दुष्काळाची चोरपावले ओळखून सरकारने वेळीच नियोजन करायला हवे होते, अशी टिप्पणी ठाकरे यांनी या भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना केली. आमदार बाळा नांदगावकर, आमदार सरदेसाई, सुनील आर्दड, नारायण चाळगे, श्रीराम राठोड, सुदाम सदाशिने आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.