महावितरणमध्ये उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ विधि अधिकारी, प्रणाली विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक आदी विविध ११ पदांसाठी ६, ७ व ८ नोव्हेंबरला झालेल्या ऑनलाईन परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वैयक्तिक मुलाखती २ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबईत घेतल्या जाईल. या ऑनलाईन परीक्षेत पात्र उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखतीसाठी प्रवेशपत्रे, सूचना व मुलाखतीचे स्थळ इत्यादी माहिती महावितरणच्या http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रमाणपत्रे सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची असून ती सादर करण्यात अपयश आल्यास संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल.