विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि गांजाची विक्री करण्यास आलेल्या तरुणास शहापूर पोलिसांनी मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे अटक केली. आसिफ गनी शेख असे या तरुणाचे नाव असून तो शहापूरजवळील कळंभे गावचा राहणारा आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर रिव्हॉल्वर विक्री आणि गांजा विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील वडके व त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला होता. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आसिफ महामार्गावरच्या एका हॉटेलसमोर उभा होता, त्या वेळी पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्याकडे विविध मोबाइल कंपन्यांची सिमकार्ड्स पोलिसांना सापडली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2013 रोजी प्रकाशित
रिव्हॉल्वर विक्री करणाऱ्यास अटक
विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि गांजाची विक्री करण्यास आलेल्या तरुणास शहापूर पोलिसांनी मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे अटक केली.
First published on: 15-10-2013 at 07:27 IST
TOPICSरिव्हॉल्व्हर
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revolver seller arrested