मराठवाडय़ासह विदर्भात अनेक ठिकाणी घरफोडय़ा करणारी टोळी िहगोली पोलिसांनी जेरबंद केली. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
येथील जिजामाता नगर भागात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची टोळी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपअधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संग्राम सांगळे, सी. पी. काकडे, सहायक निरीक्षक विवेक सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. रात्रीच्या वेळी काहीजण आदर्श महाविद्यालयाच्या मागे आढळून आले. पोलिसांची गाडी पाहताच दरोडेखोरांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून सुरेश ऊर्फ नेपाळ्या शिकरू काळे, आनंदा भिकाजी काळे, तुकाराम सखाराम काळे, लक्ष्मण माणिक पवार, दिनेश गणपत काळे व रामा माणिक पवार यांना अटक केली. त्यांच्याकडून दरोडय़ासाठी वापरण्यात येणारे लोखंडी सळई, काठी, दोरी, मिरची पुड आदी साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी या आरोपींना न्यालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस कोठडीत या दरोडेखोरांनी िहगोली, सेनगाव, औंढा नागनाथसह विदर्भातील रिसोड, मंगरूळपीर, वाशिम, बुलढाणा, कारंजा आदी ठिकाणी घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सोन्याचे गंठण, िबदियासह दागिने असा १ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2014 रोजी प्रकाशित
मराठवाडा, विदर्भात घरफोडय़ा करणारी ६ जणांची टोळी जेरबंद
मराठवाडय़ासह विदर्भात अनेक ठिकाणी घरफोडय़ा करणारी टोळी िहगोली पोलिसांनी जेरबंद केली. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

First published on: 04-01-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in marathwada gang arrest hingoli