संगीतात लोकांना जोडण्याची मोठी जादू आहे. हे एक शक्तिशाली माध्यम आहे. यातून सर्वानाच मोठी ऊर्जा मिळते. देशात खास करून तरुण पिढीसाठी सबबर्नने महत्त्वाच्या ३० शहरांमध्ये म्युझिकल फेस्टिव्हल आयोजित केल्याची माहिती सबबर्नचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंग यांनी सांगितले.
सबबर्नने नृत्य संगीत चाहत्यांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय गाठण्यासाठी  ‘सबबर्न रिलोड’ या नव्या ब्रॅण्डचे लोकापर्ण शुक्रवारी नागपुरात केले. उद्या शनिवारी, २९ जूनला दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सन एन सॅण्डमध्ये ‘सबबर्न म्युझिकल फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. सबबर्न रिलोड देशात चंदिगड, नागपूर, भोपाळ, मुंबई, पुणे,  बंगळुरू यासह ३० शहरांमध्ये हा महोत्सव घेणार आहे. यामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचे मनोरंजनाचे मिश्रण दिसणार असून ५० च्यावर कार्यक्रम होणार आहेत. सबबर्नने शुक्रवारी चंदिगडमध्ये हा फेस्टिव्हल आयोजित करून या मोहिमेचा शुभारंभ केला. गोव्यात डिसेंबरमध्ये या वर्षांतील अखेरचा फेस्टिव्हल होणार आहे.
२०१२-१३ मध्ये मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरू येथील शानदार सबबर्न हंगामानंतर हा ब्रॅण्ड देशात बऱ्याच शहरांमध्ये पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोक या फेस्टिव्हलकडे आकर्षित होत आहेत. या वर्षीच्या सप्टेंबर व डिसेंबरमध्ये मोठे फेस्टिव्हल होणार आहेत. या संगीताला आणि ब्रॅण्डला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. खेळ, वाचन, संगीत अशा माध्यमातून चाहत्यांना एक ताजा अनुभव दिला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स डान्स म्युझिकने तरुणांना वेड लावले आहे. म्युझिकल फेस्टिव्हलमध्ये तरुणपिढी सात ते आठ तास भरपूर आनंद लुटणार आहे. या ब्रॅण्डने जगभरातील सर्वोत्तम कलाकारांना सहभागी करून उत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, असे शैलेंद्र सिंग म्हणाले.