आमिर खानचे मराठीचे धडे गिरवून झाले. तो मराठी चित्रपटात काम करणार की नाही हे मात्र अजून कळलेले नाही. पण त्याच्याही आधी सलमानने आपला नंबर लावला आहे. रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात सलमान खानने एक दृश्य करण्याची तयारी दाखवली आहे. याआधी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मराठी चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर गेली कित्येक वर्षे हिंदीतील नावाजलेल्या कलाकारांनी मराठी चित्रपटाकडे आपली वाट वळवली नव्हती.
सध्या त्यांच्यापैकी काहीजण मराठी चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने गंभीर विचार करीत असले तरी कोणी मराठी चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली नव्हती. आता रितेशच्या प्रयत्नांमुळे ‘दबंग’ सलमान खान मराठीत दिसणार आहे. ‘लय भारी’ या चित्रपटातून स्वत: रितेश मराठीत पदार्पण करतोय. निशिकांत कामत दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानने एक छोटे दृश्य करावे, असे त्याला रितेशने सुचविले होते. सलमाननेही रितेशकडून चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर ते दृश्य करण्यास होकार दिला. त्यामुळे रितेशच्या पहिल्या मराठी चित्रपटात सलमानही मराठीच्या रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे.याआधी मराठीत जॅकी श्रॉफने काम केले होते, तर अमिताभ बच्चनचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांच्या ‘अक्का’ या मराठी चित्रपटात अमिताभ-जया बच्चन यांच्यावर एक गाणे चित्रित करण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2013 रोजी प्रकाशित
रितेशसाठी सलमान मराठीत!
आमिर खानचे मराठीचे धडे गिरवून झाले. तो मराठी चित्रपटात काम करणार की नाही हे मात्र अजून कळलेले नाही. पण त्याच्याही आधी सलमानने आपला नंबर लावला आहे.
First published on: 25-08-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman in marathi for ritesh deshmukh