नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांच्या कौशल्य विकासावर भर देत रोजगाराच्या दालनाचा नवा मार्ग सोमलवार अकादमी ऑफ प्रोफेशनल स्टडीजने (सॅप्स) खुला केला आहे.
सोमलवार शिक्षण संस्थेच्या शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने सॅप्सची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण देण्याचे काम होती घेतले. यासाठी शिक्षणतज्ज्ञ, कंपन्यातील मनुष्य बळ व्यवस्थापक, उद्योजक, सीए, सीएस, कॉर्पोरेट्स क्षेत्रातील तज्ज्ञ, अवजड वाहतूक आणि साठवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून माहिती गोळा करून चार अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. यात पीजी डिप्लोमा इन लॉजेस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेन्ट, सर्टिफाईड प्रोफेशनल अकाऊंटन्ट, कस्टमर रिलेशनशिप एक्झिकेटिव्ह, डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रेड हे प्रोफेशनल अभ्यासक्रम तयार केले आहेत. हा अभ्यासक्रम करणाऱ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्याचादेखील प्रयत्न केला जातो.
दहावी-बारावीत शिक्षण अर्धवट सोडून काम-धंद्याकडे वळावे लागते. अन्य कारणांमुळे काही कौशल्य मागे पडलेल्यांना शिक्षणाची किंमत कळायला लागते. हाच विचार समोर ठेवून हा खास अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात नागपूर मोठे ‘ट्रान्सपोर्ट हब’ होण्याची शक्यता असल्याने नागपुरात येणाऱ्या उद्योगांच्या व कार्पोरेट्सच्या मागणीचा विचार करून या अभ्यासक्रमाची रचना केली आहे, असा दावा सॅप्सच्या संचालकांचा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2015 रोजी प्रकाशित
रोजगाराच्या दालनाचा ‘सॅप्स’चा नवा मार्ग
नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांच्या कौशल्य विकासावर भर देत रोजगाराच्या दालनाचा नवा मार्ग सोमलवार अकादमी ऑफ प्रोफेशनल स्टडीजने (सॅप्स) खुला
First published on: 29-05-2015 at 12:12 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saps for recruitment