माजी खासदार विलास गुंडेवार यांच्या पार्थिवावर कयाधु नदीतिरी अंत्यसंस्कार झाले. त्याचे चिरंजीव अॅड. स्वप्नील यांनी अग्नी दिला. या वेळी राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांची मोठी गर्दी होती.
गुंडेवार यांनी िहगोली लोकसभा मतदारसंघाचे १९९१ ते १९९६ या काळात नेतृत्व केले. नागनाथ सहकारी बँकेचे ते संस्थापक अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. दोन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालावली.
कयाधु नदीच्या तिरावर सोमवारी त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेकांनी गुंडेवार यांना श्रध्दांजली वाहिली. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, खासदार सुभाष वानखेडे, आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, राजीव सातव, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, सर्वोच्च न्यालयातील अॅड. शिवाजीराव जाधव, अॅड. माधवराव नाईक, माजी खासदार डी. बी. पाटील व शिवाजीराव माने, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, ब्रिजलाल खुराणा, सुनील देवडा, अॅड. सतीश देशमुख, नांदेडचे एकनाथ मामडे, रामजी भाई जोशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, नारायराव खेडकर आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2014 रोजी प्रकाशित
गुंडेवार यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
माजी खासदार विलास गुंडेवार यांच्या पार्थिवावर कयाधु नदीतिरी अंत्यसंस्कार झाले. त्याचे चिरंजीव अॅड. स्वप्नील यांनी अग्नी दिला. या वेळी राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांची मोठी गर्दी होती.

First published on: 07-01-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sendoff to mp vilas gundewar hingoli