केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) गेल्या मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेत येथील जवाहर नवोदय विद्यालयाने देदीप्यमान यश मिळविले.
दहावीच्या परीक्षेत विद्यालयातील ६८ पैकी ६७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, यातील ४९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. श्यामली सौंदळे व मजहर शेख ९५ टक्के गुणांसह सर्वप्रथम आले. अपेक्षा कुलकर्णी (९४.८ टक्के) दुसरी, तर राजशेखर उटगे (९३.६० टक्के) तिसरा आला. अपेक्षा कुलकर्णी मराठी विषयात १००पैकी १०० गुणांसह राष्ट्रीय स्तरावर झळकली. बारावी कला व विज्ञान शाखांचा निकाल १०० टक्के लागला. ४८ पैकी ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, यात २७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत आकाश साकोळे (९५.८० टक्के) पहिला, अजय तिडोळे (९४.२० टक्के) दुसरा व आकाश वाघमारे (९०.८ टक्के) तिसरा आला. कला शाखेत गणेश टेकाळे (९३ टक्के), संगीता िशदे (८९.४० टक्के) व मारुती कोकणे (८९ टक्के) पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य गंगाराम सिंह, जिल्हाधिकारी बिपीन शर्मा यांनी अभिनंदन केले.