जिल्हा परिषदेचे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होऊनही शासन त्यांना परत बोलवत नसल्याचे बघून पदाधिकाऱ्यांनी ५ फेब्रुवारीला नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अरुण शिंदे यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध पदाधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरला अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्याला दीड महिन्याचा अवधी झाल्यानंतरही त्यांचा सेवा परत घेण्याबाबत शासन स्तरावर काहीच कार्यवाही होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
आयुक्तांच्या कार्यालयात दुपारी १२ वाजतापासून ठिय्या आंदोलन करण्याची एकमुखी भूमिका सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, सभापती गुणवंत कारेकर, अरुण निमजे, नीळकंठ कोरांगे, अमृता सूर, देवराव भोंगळे, सतीश वारजूकर यांनी येथे दिलेल्या पत्रकात दिली आहे.