विदर्भ साहित्य संघाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला राज्यस्तरीय लेखिका संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रात काम करणाऱ्या आधार संस्थेकडे लेखिका संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विदर्भ साहित्य संघातर्फे दरवर्षी विविध प्रवाही साहित्य संमेलन विदर्भ पातळीवर आयोजित केली जातात. यावर्षी विदर्भ साहित्य संघाच्या स्थआपनेला ९० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त उपराजधानीत राज्यपातळीवर महिला संमेलन घेण्यात येणार आहे.
या संमेलनात राज्यातील विविध भागातील महिला लेखिका, समीक्षक, कवी सहभागी होणार आहे. दोन दिवस होणाऱ्या संमेलनात कवियित्री संमेलन, प्रकट मुलाखत, मुक्त काव्यधारा, परिसंवाद, ग्राफिटी वॉल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रपट आणि नाटक या विषयावर एक परिसंवाद राहणार असून त्यात चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील अभिनेत्रीचा सहभाग राहणार आहे. सेमेलनात नवोदित लेखिका आणि कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदाची सूत्रे माजी उपमहापौर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी स्वीकारली आहे.
या शिवाय डॉ. रवींद्र शोभणे आमंत्रक तर डॉ. अविनाश रोडे कार्याध्यक्ष म्हणून संमेलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.