स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून सोलापूरच्या दोन सराफांची १२ लाखांची बॅग भरदिवसा पळविण्यात आली. भूम तालुक्यातील माणकेश्वर-देवंग्रा परिसरात हा प्रकार घडला.
सोलापूर येथील सराफा व्यापारी हे व्यंकटेश बनसोडे व प्रशांत गायकवाड यांना सोबत घेऊन सोमवारी परंडा शहरात आले. सोन्याचे आमीष दाखविणा-याशी त्यांचे मोबाईलवर बोलणे झाले. सराफास भूम रस्त्याने माणकेश्वर फाटय़ाजवळ येण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्यापारी व सहकारी इंडिकातून माणकेश्वर परिसरात गेले. तेथे व्यापा-याची गाडी थांबवून त्यांना शेतात नेण्यात आले व त्यांच्याकडील १२ लाख रुपये रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. व्यापा-यांना मारहाण करून भामटे शेतात पसार झाले.
माहिती मिळताच भूमचे, तसेच परंडय़ाचे पोलीस तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी एकसष्टया पोपट काळे व एका महिलेस संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर महिलेस सोडून दिले. काळेविरुद्ध ४ गुन्हे नोंद असल्याने त्याची रवानगी गुन्हे अन्वेषण विभागाकडे करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
सोलापूरच्या दोघा सराफांची १२ लाखांची बॅग पळविली
स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून सोलापूरच्या दोन सराफांची १२ लाखांची बॅग भरदिवसा पळविण्यात आली. भूम तालुक्यातील माणकेश्वर-देवंग्रा परिसरात हा प्रकार घडला.

First published on: 19-02-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stolen 12 lakh rs bag from saraf of solapur