मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ हा देशातील सर्वाधिक मोठा तंत्र महोत्सव सुरू होण्याआधीच त्याच्या प्रतिष्ठेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यंदा टेकफेस्टला ‘युनेस्को’ आणि ‘युनिसेफ’चे पालकत्त्व लाभले आहे. त्याचबरोबर टेकफेस्टच्या ‘आयस्मोक’ या कॅन्सरविरोधी मोहिमेमध्ये सर्वाधिक ‘डुडल्स’ जमा झाले असून त्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.
टेकफेस्टमध्ये खेळ, मनोरंजन, मार्गदर्शन यांच्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कामाचा भाग म्हणून जून महिन्यात ‘आयस्मोक’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. ‘आय सपोर्ट दि मुव्हमेंट टू किल कॅन्सर’ असे या मोहिमेचे घोषवाक्य होते. धूम्रपानाची सवय तरुणांमध्ये अगदी सहजगत्या रुजू शकते.
अनेकांना याचे तोटे लक्षात येतात. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींबरोबरच त्याच्या आजुबाजूला वावरणाऱ्या लोकांनाही त्याचा फटका सहन करावा लागतो. याचे सर्वाधिक बळी लहान मुले ठरतात. धूम्रपानाचे हे तोटे आयस्मोकच्या माध्यमातून लक्षात आणण्यासाठी आयआयटीने ही मोहीम हातात घेतली होती. ३ जानेवारीपासून आयआयटीच्या पवई संकुलात सुरू होणाऱ्या टेकफेस्टमध्ये ही मोहीम अंतर्भूत असणार आहे.
युनेस्को आणि युनिसेफनेही देशात आणि देशाबाहेर हा उपक्रम पोहोचावा यासाठी टेकफेस्टच्या आयोजक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. या शिवाय ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’ची मदतही आयस्मोकला झाली. देशातील ३२ शहरांमध्ये ६४ महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी तब्बल २१ हजार ३८३ डुडल्स जमा झाले होते. या मोहीम पुढे भारताबाहेर २० देशांमध्ये विस्तारली. या देशांमधूनही आयस्मोकला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
‘या मोहिमेदरम्यान एका विद्यार्थ्यांने आयस्मोकचा संदेश देणारे एक छायाचित्र ही मोहीम सर्वदूर पसरण्यास कारणीभूत ठरले. सोशल नेटवर्किंमुळे हे चित्र जगभर पसरले आणि चित्राबरोबर आयस्मोक ही मोहीम देखील जगभर पसरले,’ अशी माहिती टेकफेस्टच्या आयोजकांपैकी एक असलेल्या अमन मंत्री या विद्यार्थ्यांने दिली.
मोहिमेदरम्यान डॉक्टरांच्या धूम्रपानाच्या दुष्परिणामांची माहिती देणारे व्याख्यान महाविद्यालयांमधून आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर एक अॅन्ड्रॉईड अॅप तयार करून त्याद्वारे भारतातील कॅन्सरवर उपचार करणाऱ्या रूग्णालयांची माहिती, उपचार पद्धती, ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’द्वारे प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2014 रोजी प्रकाशित
‘टेकफेस्ट’च्या ‘आयस्मोक’ मोहिमेची दखल
मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ हा देशातील सर्वाधिक मोठा तंत्र महोत्सव सुरू होण्याआधीच त्याच्या प्रतिष्ठेत आणखी
First published on: 02-01-2014 at 08:44 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Techfests anti smoking drive enters limca book