दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने बंगळुरू येथे आयोजित नाशिक विभागातील सर्व सहकारी बँकांच्या परिषदेत २०१२-१३ या आर्थिक वर्षांत उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सहकारी बँकांना गौरविण्यात आले.
परिषदेचे उद्घाटन रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक करुपासामी यांच्या हस्ते झाले. परिषदेस रिझव्र्ह बँकेचे ए. के. बेरा, पी. के. अरोरा, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, नामको बँकेचे प्रशासक जे. पी. भोरिया आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष अजय ब्रrोचा यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. ५०० कोटींच्या पुढील ठेवीच्या गटात जळगाव पीपल्स बँक लिमिटेड, जळगाव बँकेस प्रथम पुरस्कार देण्यात आला. २०० ते ५०० कोटी ठेवींच्या गटात दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक, १२५ ते २०० कोटी ठेवी गटात नाशिकची श्री समर्थ सहकारी बँक यांना प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. याच गटात द्वितीय क्रमांक जनकल्याण बँक आणि विश्वास बँक, तर ७५ ते १२५ कोटी ठेवींच्या गटात पिंपळगाव र्मचट्स बँकेने प्रथम, नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक व बिझनेस बँक यांना द्वितीय क्रमांक, २५ ते ७५ कोटी ठेवी गटात मालेगाव येथील जनता बँक प्रथम, निफाड अर्बन बँक व येवला र्मचट्स बँक यांना द्वितीय क्रमांक मिळाला. २५ कोटींपर्यंत ठेवींच्या गटात नाशिकच्या फैज र्मकटाइल बँकेस प्रथम, निफाड अर्बन बँक व मालेगावची इंदिरा महिला बँक यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला.
प्रास्ताविकात नाशिक जिल्हा बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे यांनी विभागातील सर्व सहकारी बँकांच्या संचालकांना व अधिकाऱ्यांना सहकारी बँकिंगविषयी सविस्तर मार्गदर्शन करावे, तसेच सहकारी बँकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण होण्यासाठी अद्ययावत करणे यासाठी ही परिषद घेण्यात आल्याचे सांगितले. कामकाज करताना रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास सहकारी बँका सक्षम होतील. सहकारी बँकांविषयी रिझव्र्ह बँकेचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक राहील व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यास रिझव्र्ह बँक अग्रेसर राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. नाशिक विभागातील ५२ सहकारी बँकांचे २५० प्रतिनिधी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
नाशिक विभागातील उत्कृष्ट नागरी सहकारी बँकांचा गौरव
दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने बंगळुरू येथे आयोजित नाशिक विभागातील सर्व सहकारी बँकांच्या परिषदेत २०१२-१३ या आर्थिक
First published on: 24-01-2014 at 07:44 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The best urban co operative banks glory in nashik