‘डॉन बॉस्को इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली सौर ऊर्जेवर चालणारी तीन चाकी गाडी नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कौतुकाचा विषय ठरली आहे. संस्थेतील तृतीय वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही गाडी तयार केली आहे. ग्रीन क्रुझर नामक ही गाडी भारतातील पहिली सौर उर्जेवर चालणारी तीनचाकी गाडी ठरण्याची शक्यता आहे. ही तीन चाकी गाडी ५०० डब्ल्यू बीएलडीसीच्या मोटरवर चालते. ही मोटर गाडीला लावलेल्या सोलर पॅनरवर चालणाऱ्या बॅटरीवर चालते. ताशी ३५ ते ४० किलोमीटर धावण्याची ग्रीन क्रूझरची क्षमता आहे. सूर्याची किरणे नसतानाही दीड ते दोन तास ग्रीन क्रुझर धावू शकते. या काळात केवळ बॅटरीवर ५० किलोमीटरचे अंतर कापण्याची ग्रीन क्रुझरची क्षमता आहे. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत या गाडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
सौर ऊर्जेवरील गाडी..
‘डॉन बॉस्को इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली सौर ऊर्जेवर चालणारी तीन चाकी गाडी नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कौतुकाचा विषय ठरली आहे.

First published on: 29-03-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three wheeler on solar energy