केंद्रीय गृहमंत्री सुशीलकमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या भेटीवर सोलापूरला येत आहेत. या भेटीत ते ‘रोजा इफ्तार’ पार्टीतही सहभागी होणार आहेत. याशिवाय डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार वितरण समारंभासही ते हजेरी लावणार आहेत. हे दोनच कार्यक्रम त्यांनी या दोन दिवसांच्या भेटीत स्वीकारले आहेत.
शिंदे हे उद्या सकाळी मुंबईहून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात दाखल होणार आहेत. सायंकाळी ६.४५ वाजता पोलीस मुख्यालयाजवळील अॅचिव्हर मंगल कार्यालयात माजी महापौर आरिफ शेख यांनी आयोजिलेल्या रोजा इफ्तार पार्टीत शिंदे सहभागी होणार आहेत. तर रविवारी, २८ जुलै रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्कार वितरण सोहळय़ास प्रमुख पाहुणे म्हणून ते हजर राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना समाजसेवेसाठी, तर प्रा. निशिकांत ठकार यांना साहित्यसेवेसाठी डॉ. फडकुले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रात्री ते रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2013 रोजी प्रकाशित
सुशीलकुमारांचा आज सोलापुरात ‘रोजा इफ्तार’ पार्टीत सहभाग
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या भेटीवर सोलापूरला येत आहेत. या भेटीत ते ‘रोजा इफ्तार’ पार्टीतही सहभागी होणार आहेत.

First published on: 27-07-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today sushil kumar shinde in solapur for roza iftar party