नागरी क्षेत्रातील झाडांचे जतन आणि नवीन झाडांची मोठय़ा प्रमाणात लागवड व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता ठाणे महापालिकेने तीन दिवसीय ‘वृक्षवल्ली-२०१४’ प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनास शहरातील सुमारे ५० हजारहून अधिक वृक्षप्रेमींनी भेट देऊन नव्या झाडांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच वृक्षप्रेमींनी वेगवेगळ्या झाडांची खरेदी केल्यामुळे या प्रदर्शनात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत १७ ते १९ जानेवारी या कालवधीत गावदेवी मैदानात वृक्षवल्ली प्रदर्शन भरविण्यात आले होते. गेल्या आठ वर्षांपासून अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या प्रदर्शनात झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनात माहीम नेचर पार्क (मुंबई), मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका, मिरा-भाईंदर महापालिका यांच्यासह नामांकित संस्था सहभागी झाल्या होत्या. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वाडा, वांगणी, कुर्ला, दापोली, पुणे, नाशिक, कोलकाता आदी भागातील नर्सरी व कृषीविषयक बी-बियाणे, उत्पादने, औषधे, अवजारे, कुंडय़ा आदींचे एकूण ४० स्टॉल आणि शंभर वैयक्तिक स्पर्धक सहभागी झाले होते. शोभिवंत पानाफुलांच्या कुंडय़ा, वामनवृक्ष, हंगामी फुलझाडे, कॅक्टस, सकुलंट, ब्रोमोलियास, सुंगधी आणि औषधी वनस्पती, वृक्षरोपे, गुलाब पुष्प, आम्री (ऑर्किडस्), कट फ्लॉवर आणि कलात्मक पुष्परचना, विविध फळांची मांडणी, भाज्यांची मांडणी, निसर्ग आणि पर्यावरणावर अधारित छायाचित्रे, रंगचित्रे, उद्यानांची प्रतिकृती आदी प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
वृक्षवल्ली प्रदर्शनास उदंड प्रतिसाद
नागरी क्षेत्रातील झाडांचे जतन आणि नवीन झाडांची मोठय़ा प्रमाणात लागवड व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता ठाणे महापालिकेने
First published on: 22-01-2014 at 07:50 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree plantation and conservation