दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश असल्याने ‘नवीन मोठय़ा औद्योगिक वसाहतीमध्ये संधी आणि आव्हाने’ या विषयावर महात्मा गांधी मिशनच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्यावतीने ४ व ५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरालगतच्या करमाड, बिडकीन येथे भूसंपादनास सुरुवात झाली आहे. औद्योगिक वसाहत उभारताना अनेक अडचणी व किचकट कायदेशीर प्रक्रियांना सामोरे जावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. जमीन हस्तांतरण, करसवलत, कामगारांसाठीचे कायदे यांवरही चर्चा आवश्यक आहे. या क्षेत्रात ९ अतिविशाल औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार असून त्यांना सुमारे ४ हजार मेगाव्ॉट वीज लागणार आहे. रेल्वे, विमानतळ आणि इतर वेगवेगळे उद्योगही या इंडस्ट्रियल कॉरिडोरमध्ये असणार आहेत. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आयोजित परिषदेत शोधनिबंध पाठविता येतील. २८ सप्टेंबपर्यंत शोधनिबंध पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या परिषदेचे मुख्य मार्गदर्शक अंकुश कदम आहेत.