कोयना धरणासह सातारा व रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग हलवून सोडणारे भूकंपाचे दोन धक्के गुरूवारी रात्री जाणवले. पहिल्या धक्क्याची नोंद रिश्टर स्केलनुसार ४ रिश्टर स्केल, तर दुसरा ३ रिश्टर स्केल होता. मात्र, सुदैवाने वित्तहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार रवींद्र हसबनीस यांनी दिली. भूकंपाचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता एम. आय. धरणे यांनी दिली. गुरूवारी रात्री १०.१० वा. ४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १०.४ किलोमीटर अंतरावर गोशवाडी गावच्या दक्षिणेस होता. त्याची खोली ८ कि. मी. इतकी होती. तर ११.०४ वाजता दुसरा भूकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू १०.४ कि. मी. अंतरावर पहिल्याच ठिकाणी होता. हा भूकंपाचा धक्का प्रामुख्याने कोयना, पाटण, कराड, अलोरे, चिपळूण या विभागात जाणवला. मात्र, भूकंपामुळे कोठेही वित्तहानी झाली नसल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले. तर, कोयना धरण पूर्णत: सुरक्षित असल्याचे एम. आय. धरणे यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2013 रोजी प्रकाशित
कोयना परिसरात दोन वेळा भूकंप
कोयना धरणासह सातारा व रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग हलवून सोडणारे भूकंपाचे दोन धक्के गुरूवारी रात्री जाणवले. पहिल्या धक्क्याची नोंद रिश्टर स्केलनुसार ४ रिश्टर स्केल, तर दुसरा ३ रिश्टर स्केल होता.

First published on: 08-09-2013 at 02:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two time earthquake in koyna surroundings