उरण तालुक्यातील शेती औद्योगिकीकरणासाठी संपादीत केल्यापासून उरणमधील मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. उरणमधील वाढलेल्या वाहनांमुळे तसेच अवजड वाहनांच्या अतिक्रमणांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत असताना गुरांचे अतिक्रमणही वाढल्याने आहे. तसेच अवजड वाहनांमुळे गुरांचा बळी जाण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत.
उरण तालुक्यातील मोकाट गुरे प्रामुख्याने उरण-पनवेल रस्त्यावरील बोकडवीरा, कोटनाका, जासई तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बवरील धुतूम चिल्रे, उरण -चिरनेर मार्गावरील कोप्रोली, टाकी भोम या मार्गावर प्रामुख्याने आढळतात. यापैकी उरण-पनवेल तसेच राष्ट्रीय महामार्ग कमांक ४ बवरील पागोटे, धुतूम या ठिकाणी आहेत. उरण तालुक्यातील मोकाट गुरांची संख्या ६०० च्या घरात आहे. त्यामध्ये बल, गाई, वासरे आहेत. या मोकाट गुरांना कोणीच वाली उरलेला नाही. तर मोकाट गुरांची समस्या केवळ ग्रामीण भागातच नाही तर उरण शहरातही मोकाट गुरांमुळे नागरिक व व्यापारी त्रस्त आहेत. शहरात मोकाट गुरांसाठी पांजरपोळ आहे. मात्र त्याची दुरवस्था झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
मोकाट गुरांमुळे उरणकर हैराण
उरण तालुक्यातील शेती औद्योगिकीकरणासाठी संपादीत केल्यापासून उरणमधील मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. उरणमधील वाढलेल्या वाहनांमुळे
First published on: 29-01-2014 at 08:02 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran people fed up with street animals