सामान्य माणसाला टपाल क्षेत्राची भूमिका आणि बदलत्या स्वरूपाविषयी जागरूक करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय टपाल सप्ताह येत्या १५ ऑक्टोबपर्यंत साजरा केला जाणार आहे.
जगात सर्वात मोठे टपाल नेटवर्क भारत सरकारच्या संवाद आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल खात्याचे आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासात राष्ट्रीय टपाल विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बँक, विमा कंपन्यांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान केव्हाच आले आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत टपाल खात्यानेही स्वत:च्या कार्यप्रणालीत बदल केले आहेत. टपाल विभागाची कोअर बँकिंगची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. स्पिड पोस्ट, ई-पोस्ट, बिझीनेस पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, मनी ट्रान्स्फर सव्र्हिसेस, इलेक्ट्रॉनिक मनिऑर्डर, बचत योजना आणि टपाल जीवन विमा योजना याही क्षेत्रात टपाल विभागाने गती घेतली आहे.
राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम राबवून टपाल खात्याच्या विविध योजनांची माहिती सर्वदूर पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये टपाल सेवेविषयी जनजागृती करणे, विविध बचत योजनांची माहिती ग्राहकांना प्रदान करणे, डाकमुद्राविद्या स्पर्धा, टपाल विमा योजनेची माहिती आदी देणे सुरू आहे. उद्या, ‘डाक मुद्राविद्या’ (फिलेट्ली) या विषयावर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबरला ग्राहकांना स्पिड पोस्ट, बिझनेस पोस्ट, डायरेक्ट मेल, एक्सप्रेस पार्सल पोस्ट आणि लॉँजिस्टिक पोस्ट डाक जीवन विमा योजना गेल्या एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आली असून कमी हप्ता, जास्त बोनस अशी आहे. १९ ते ५५ वयोगटाच्या लोकांना ही जीवन विमा योजना घेता येईल. महिन्याचा हप्ता आगाऊ भरल्यास १२ महिन्यासाठी दोन टक्के तर सहा महिन्यासाठी एक टक्का सुट दिली जाईल.
विम्याची कमाल मर्यादा २० लाख आणि करामध्ये सूट असे विविध फायदे असल्याची माहिती नागपूर विभागाचे अधीक्षक बी. एम. मेश्राम यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय टपाल सप्ताहात विविध उपक्रमांची भरमार
सामान्य माणसाला टपाल क्षेत्राची भूमिका आणि बदलत्या स्वरूपाविषयी जागरूक करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय टपाल सप्ताह येत्या १५ ऑक्टोबपर्यंत साजरा केला जाणार आहे.
First published on: 12-10-2013 at 08:50 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Variouse programmes in national post week