कराड जनता उद्योगसमूहाचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव पाटील-वाठारकर यांचा  ७६ वा वाढदिवस वहीतुला, शालेय साहित्यांचे वाटप, रोपांचे वाटप व वृक्षारोपण, अंगणवाडी व रुग्णालयात खाऊ वाटप यासह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, नाफेडचे अध्यक्ष बिजिंदर सिंग, खासदार सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, मंत्री आर. आर. पाटील, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर आदी मान्यवरांनी वाठारकर यांचे दूरध्वनीवरून अभीष्टचिंतन केले, तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व शेकडो हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून वाठारकर बापू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.