जिल्हय़ात ८ टँकरद्वारे १२ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ११६ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केले असून १०३ ठिकाणी विंधन विहिरींना पाणी लागले. नियोजित कृती आराखडय़ाच्या अंमलबजावणीस १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी आवश्यक असून टँकरची मागणी वाढू लागली आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढत आहे. लहान, कोठारवाडी, लोण (बु.), पळशी, सुराणानगर, गंगानगर, प्रगतीनगर, आशीर्वादनगर, साईनगर, शिवणी (बु.), सावरखेडा, संघ नाईकतांडा या ठिकाणी    आठ     टँकरद्वारे     पाणीपुरवठा   सुरू आहे. ६१६    विंधन    विहिरींपैकी   १२३    विहिरींचे    काम पूर्ण झाले.    पैकी    १०३   विहिरींना पाणी लागल्याची नोंद आहे.
वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई    असून   टंचाई निवारणासाठी सिद्धेश्वर धरणातून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी जवळाबाजार    समितीचे   सभापती    अंकुश    आहेर व शेतकरी    संघटनेचे    पुरुषोत्तम    लाहोटी     यांनी    केली.
दि. ७ मेपर्यंत पाणी न सोडल्यास जवळाबाजार येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.