जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या फार्मसी कॉलेजमध्ये विशेष जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रा. डॉ. टी. के. गुंड यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्यांनी, तसेच विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. एस. पी. गुंजाळ यांनी एचआयव्हीपासून संरक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पी. वाय. पवार यांनी आभार मानले.