शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारातील पोलिसांच्या जागतिक स्पर्धेत (वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स २०१३) औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील बॉम्बशोधक पथकातील पोलीस नाईक वासुदेव पद्मनाभन राजपूत यांनी पाचवे स्थान मिळविले. लंडन शहराजवळील बेलफास्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत ५४ देशांनी सहभाग नोंदविला.
राजपूत यांनी ४० ते ४९ हा वयोगट, तसेच उंची १६२ ते १७२ सें.मी. या गटात सहभाग घेतला. स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस विभागाच्यावतीने दोन पोलीस स्पर्धक पाठविण्यात आले होते. पोलीस नाईक राजपूत (वय ४७, बक्कल नं. २२३) यांनी शरीरसौष्ठव प्रकारात अन्य स्पर्धकांना मागे टाकत ही कामगिरी केली. पोलीस आयुक्त संजयकुमार, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, डॉ. जय जाधव, अरविंद चावरिया, रामेश्वर थोरात यांच्यासह अनेकांनी या यशाबद्दल राजपूत यांचे अभिनंदन केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2013 रोजी प्रकाशित
शरीरसौष्ठव प्रकारात औरंगाबादचे राजपूत जागतिक क्रमवारीत पाचवे
शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारातील पोलिसांच्या जागतिक स्पर्धेत (वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स २०१३) औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील बॉम्बशोधक पथकातील पोलीस नाईक वासुदेव पद्मनाभन राजपूत यांनी पाचवे स्थान मिळविले.
First published on: 18-08-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World police fier games