केंद्रीय आयोगातर्फे सिव्हिल सव्‍‌र्हिसेससाठी जी परीक्षा होते त्याच्या पूर्व तयारीसाठी शिवसेनेच्या युवासेना शाखेने पुढाकार घेतला असून अशा प्रवेश परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी एक वर्ष मोफत प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प येणार आहे.
 युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ‘दिशा’ नावाचा प्रकल्प सुरू केला असून प्रत्येक शहरातील निवडक विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस सारख्या नोक ऱ्यांमध्ये मराठी मुले-मुलींची संख्या अतिशय कमी असून ती वाढावी यासाठी त्यांना अचूक मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे व अशी पूर्वतयारीची परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी आपले नाव नोंदविण्यासाठी http://www.shivvidyaprabodhini.co.in या वेबसाईटवर उद्या (३१डिसेंबर)संपर्क करावा, अशी विनंती नागपूर जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी केली आहे. या प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी ५ जानेवारीला चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येईल. त्यांना परीक्षेचे केंद्र त्यांच्या इमेल पत्त्यावर पाठविण्यात येईल.