शासनाने गुटख्यावर बंदी घालूनसुध्दा कर्नाटक भागातून चोरटय़ा मार्गाने येणाऱ्या गुटख्याचे अतिसेवन केल्याने गाल सडले. त्यावर शस्त्रक्रिया करूनही इलाज होईना म्हणून वैतागलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरानजीक तळे हिप्परगा येथे हा प्रकार घडला.
बबलू अरूण चिखले (वय २८) असे या तरुणाचे नाव आहे. नाभिकाचा व्यवसाय करणाऱ्या बबलू यास कामाच्या वेळी गुटखा खाण्याची सवय जडून गेली होती. परंतु या गुटख्याच्या व्यसनामुळे त्याच्या दोन्ही गालाला जखम होऊन त्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. चेहराही विद्रूप दिसू लागला आणि प्रकृतीही ढासळू लागली. त्यामुळे वैतागलेल्या बबलूने स्वतच्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2013 रोजी प्रकाशित
गुटख्याच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या
शासनाने गुटख्यावर बंदी घालूनसुध्दा कर्नाटक भागातून चोरटय़ा मार्गाने येणाऱ्या गुटख्याचे अतिसेवन केल्याने गाल सडले. त्यावर शस्त्रक्रिया करूनही इलाज होईना म्हणून वैतागलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरानजीक तळे हिप्परगा येथे हा प्रकार घडला.

First published on: 13-10-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngster sucide due to disturbance of gutkha