गुणवत्तेला जिद्द आणि चिकाटीची जोड असेल तर तुम्ही गगनभरारी घेऊ शकता, हे देवेंद्र झाझरियाने पॅरालिम्पिकमध्ये दुसरे सुवर्णपदक पटकावून साऱ्या विश्वाला दाखवून दिले आहे. जी कामगिरी सुदृढ माणसांना जमली नाही ती अपघातामध्ये डावा हात गमावलेल्या या भालाफेकपटूने करून दाखवली आहे. यापूर्वी २००४ साली अथेन्समध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्रने पहिले सुवर्णपदक पटकावले होते, त्यानंतर आता रिओमध्ये त्याने दुसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

देवेंद्रचा जन्म आपल्या साऱ्यांसारखाच. अगदी सुदृढ. लहान मुलांसारखा तोही मस्तीखोर होता. देवेंद्र आठ-नऊ वर्षांचा असेल. एकदा झाडावर चढताना एका उघडय़ा वायरला त्याचा हात लागला. त्या वायरमधून ११ हजार व्होल्टचा झटका त्याला लागला आणि तो खाली पडला. त्याचा जीव वाचेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती. पण या अपघातातून तो बचावला. शुद्धीवर आल्यावर आपला डावा हात अधू झाल्याचे त्याला समजले. हा विजेचा धक्का एवढा मोठा होता की त्याचा डावा हात अर्धा काढावा लागला. हात गेल्याचे दु:ख होतेच, पण या दु:खात त्याने स्वत:ची आहुती दिली नाही. खेळांची त्याला आवड होती. भालाफेकसारखा खेळ हातावर अवलंबून असलेला. एक हात नसला म्हणून काय झाले, आता याच खेळात कारकीर्द करण्याचा त्याने संकल्प केला. खेळायला सुरुवात केल्यावर काही महिन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली होऊ लागली. जिल्हास्तरीय स्पर्धा त्याने जिंकली आणि आपण निवडलेला मार्ग चोख असल्याचे त्याला जाणवले. स्पर्धासाठी विविध ठिकाणी जात असताना त्याला सुरुवातीला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या. कोणाच्या तरी वशिल्याने हा स्पर्धेला आल्याचे बोलले जायचे. देवेंद्र निमूटपणे सारे ऐकून घ्यायचा. पण स्पर्धा झाल्यावर मात्र तीच हिणवणारी मंडळी देवेंद्रला चॅम्पियन म्हणत अभिनंदन करायला यायची. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही. आपल्या कामगिरीतूनच तो साऱ्या टीकाकारांना उत्तरे देत आला आहे.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
Holi 2024
Holi 2024: गोऱ्यांनाही पडली होती भारतीय रंगांची भुरळ; युरोपियन पाहुण्यांनी होळीचे दस्तऐवजीकरण कसे केले?

चार वर्षांपूर्वी, २००२ साली २१ व्या वर्षी देवेंद्र भारतातर्फे पूर्व आणि दक्षिण पॅसिफिक क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी झाला आणि पहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. त्यानंतर २००४ च्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण त्याच्या पदरात पडले. त्यानंतर थेट या वेळी त्याने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवा विश्वव्रिकम रचला आहे! २००४ साली देवेंद्रला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २०१२ साली त्याला पद्मश्री हा किताबही देण्यात आला.

आतापर्यंत ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंच्या पदकांचे कौतुक सारेच करतात. सत्कार करतात. अपंगत्वावर मात करून अद्भुत कामगिरी करणाऱ्या देवेंद्रसारख्या खेळाडूंकडे समाजाने एकाच नजरेतून पाहायला शिकायला हवे.