सर, मला नवीन कार घ्यायची आहे. मी फोर्ड फिगो किंवा अस्पायर ही गाडी घेण्याचा विचार करत आहे. सध्या माझे मासिक ड्रायव्हिंग ७०० किमी आहे. परंतु तीन-चार वर्षांत नोकरीसाठी अप-डाऊन करावे लागेल असे दिसते. म्हणून डिझेल गाडी घ्यावीशी वाटते. परंतु ग्रामीण भागात फोर्डच्या गाडय़ा टिकाव धरतील का, तसेच फोर्डच्या गाडय़ा मेन्टेनन्स आणि कम्फर्टच्या बाबतीत कशा आहेत. माझे बजेट सात-आठ लाख रुपये आहे, कृपया माझ्या शंकांचे निरसन करावे.

भागवत कारखेळे, शिरुर

होय, फोर्ड फिगो अथवा अस्पायर या दोन्ही गाडय़ांचे डिझेल इंजिन उत्तम आहे. या दोन्ही गाडय़ा उत्तम मायलेज देतात. १५०० सीसीचे इंजिन कमी मेन्टेनन्सचे आहे. त्यांची सव्‍‌र्हिसही उत्तम आहे आणि वर्षांतून एकदाच सव्‍‌र्हिसिंग करावी लागते.

 

माझे बजेट सहा ते नऊ लाख रुपये आहे. आम्ही साधारणत महिन्यातून एकदा तरी बाहेरगावी टूरला जातो आणि माझे रोजचे ड्रायव्हिंग २० किमी आहे. होंडा जॅझ घ्यावी की इकोस्पोर्ट की केयूव्ही१०० हे समजत नाहीय. तुम्ही आमचा संभ्रम दूर करू शकाल का. पेट्रोल गाडी घ्यावी की डिझेलवर चालणारी. तुमच्याकडे चांगले पर्याय असतील तर कृपया सांगा.

अविनाश मेढे, पुणे

तुम्ही पेट्रोलवर चालणारी गाडी घ्या. केयू्व्ही१०० ही एक चांगली गाडी आहे. परंतु तुम्हाला अधिक कम्फर्ट हवा असेल तर मी तुम्हाला फोक्सव्ॉगन अ‍ॅमियो पेट्रोल ही गाडी सुचवेन. या गाडीचा मायलेज चांगला असून परफॉर्मन्सही उत्तम आहे.

 

मी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आहे. मी साधारणत कार घेतली की ती ओला-उबर यांच्याकडे त्या चालवायला देतो. खूप संशोधन केल्यानंतर मला असे आढळले की डॅटसन गो सीएनजी मॉडेल हे ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी चांगले आहे. कृपया मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे.

राहुल गोरे

होय, डॅटसन गोला १.२ लिटरचे इंजिन आहे जे की सीएनजीमध्ये उत्तम कामगिरी बजावते. तसेच मायलेजही सर्वोत्तम देते. या गाडीत बूट स्पेस चांगला असून १६ किलोचे सिलिंडर त्यात आरामात बसू शकते. तुमचे बजेट जास्त असेल तर मी तुम्हाला टोयोटा इटिऑस पेट्रोल वा सीएनजी घेण्याचा सल्ला देईन.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com