डॉ. मेधा ओक

वजन काही केल्या कमी होत नाही, केस गळतात, अनियमित मासिक पाळी, थकवा, गर्भधारणा होत नाही तेव्हा थायरॉईड ह्या अंतःस्रावी ग्रंथीचा विचार केला जातो.पण खरंतर ह्याचा आजार कुठच्याही वयात होऊ शकतो. जन्मतःच क्रेटिनिझम, तसेच पुरुष, वयात येणारी मुलंमुली वयोवृद्ध ह्यांनाही त्रास होऊ शकतो. सध्या भारतात ४२ ते ४५ लाख लोकांना ह्याचा त्रास आहे.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

आठ अंतःस्रावी ग्रंथी (म्हणजेच ऐंडोक्राईन ग्लॅण्ड) मधील थायरॉईड ही सर्वात मोठी ग्रंथी. (master gland). तिला मेंदूस्थित पिट्युटरी आणि हायपोथँलामस नियंत्रित करतात. H किंवा Uचा आकार असतो व गळ्यात श्वास नलिकेवर तिचे स्थान असते.१५ ते २० ग्रँम वजन असते. T3 , T4 ही तिची हार्मोन्स. सरळ रक्तात मिसळतात व शरीरभर फिरतात. अतिशय सूक्ष्म प्रमाणात असूनही खूप अवयवांवर मोठे परिणाम करतात. म्हणून बिघाड झाला की बरीच वेगवेगळी लक्षणे दिसतात. चरक व सुश्रुत संहितेत, तसेच ग्रीक व ईजिप्त साहित्यात थायरॉईडचा उल्लेख आहे. गंडमाळा किंवा गाँयटर असा
‘बेस्ट फिटिंग’ ब्रा निवडायचीय?; मग ‘हे’ वाचाच!

TSH(Thyroid stimulating hormone) ची चाचणी थायरॉईड कसे काम करतेय ते अचूक दाखवते. सुरुवातीला लक्षणे सहज दुर्लक्ष करण्याइतपत असतात त्यामुळे निदानास उशीर होऊ शकतो. हल्ली कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मध्ये लवकरच निदान होते.

थायरॉईडचे काही मुख्य प्रकार सर्वसाधारणपणे दिसतात ते असेः

१.हायपोथायरॉईड–आयोडीनच्या कमतरतेमुळे खूप कमी हार्मोन्स तयार होतात अथवा रक्तात कमी सोडली जातात.

२.हायपरथायरॉईड–खूप जास्त प्रमाणात हार्मोन्स रक्तात सोडली जातात.

३.स्वतःच्याच ग्रंथीला शरीर शत्रू समजून अँन्टीबाँडी तयार करते व संतुलन बिघडवते. उदाः Graves , Hashimoto’s disease .

४.गर्भारपण आणि थायरॉईड.

५.जन्मजात अर्भकाला होणारा आजार– क्रेटिनिझम.

६.कँन्सर.

घर आणि करिअर : सेलिब्रेटीज तोल सांभाळतात कसा?

  • हायपोथायरॉईड

आयोडीन कमतरता , ग्रंथीची हानी अथवा पिट्युटरी मधे बिघाड ही प्रमुख कारणे.

भारतात जवळजवळ १०% लोकांमध्ये आयोडीनची कमतरता दिसते. इथल्या मातीतदेखील आयोडीन कमी आहे असा निष्कर्ष आहे. पूर व प्रखर सूर्यप्रकाशामुळे हानी होते .आयोडीनयुक्त मीठ हा त्यावर मोठा ईलाज आहे, ज्यामुळे ९१% लोकांना हे पुरवले जाते व ७१% लोकांची ही कमतरता भरुन निघते. लहानमुले ,गर्भवती स्त्रिया ह्यांना जास्त गरज असते. लघवीतील आयोडीनची चाचणी आणि थायरॉईडचा आकार कमतरता दर्शवतात. समुद्रीखाद्य व पाणी यात आयोडीन काही प्रमाणात आढळते .

स्वतःच्या ग्रंथीला शत्रू समजणाऱ्या अँन्टिबॉडी तयार होतात व ग्रंथीचा नाश करतात. त्या आजाराला हाशीमोटोज् असे संबोधतात. Anti thyroid peroxidase (Anti TPO)ची पातळी खूप वाढते .TSH खूप वाढते .ग्रंथीला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करते पण तो असफल ठरतो. T3, T4 काही तयार होत नाही व लक्षणे दिसायला लागतात .

क्वचित बाळंतपणानंतर ,काही लिथीयम सारख्या औषधांनी, व्हायरल इन्फेक्शन व रेडियेशननीदेखील ग्रंथीचा नाश होतो .

  • लक्षणे

चेहऱ्यावर किंवा सर्व अंगावर सूजयेणे , वजन वाढत जाणे, पोट साफ न होणे, त्वचा खरखरीत होणे , ऐकू कमी येणे, थकवा, नैराश्य , केसगळणे, अनियमित पाळी , अनेमिया , गळ्याला गाठ दिसण (goitre , आवाज घोघरा होणे , प्रलंबित कावीळ, उंची न वाढणे, हालचालीमध्ये संथपणा , उशीरा वयात येणे ही प्रमुख लक्षणे .पिट्युटरी मधे बिघाड असल्यास सगळी लक्षणे आढळत नाहीत . T4 कमी व TSH खूप जास्त ही निर्णायक चाचणी महत्त्वाची . T3 पण बरेच वेळा कमी दिसते. T4 हे मूळ संप्रेरक व

त्या पासून T3 तयार होते. ८0% T4 चे रुपांतर T3 मधे होते. दोन्ही हार्मोन्स रक्तात मिसळल्या नंतर ९९%भाग प्रथिनांशी संयोग करतात. त्यामुळे प्रथिने कमी असतील इतर कारणाने तर रिपोर्ट बरोबर येत नाहीत. पिट्युटरीचाच प्रतिसाद संथ असल्याने TSH मधील बदल दिसायला ४ ते ६ आठवडे लागतात .साधारणतः TSH ची पातळी ४.५ ते ५mIU /Ml अशी मोजतात . वय बघून ,लक्षणे बघून उपाय केले जातात.

डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ वुमन!

गर्भारपण, इतरऔषधे . लिव्हर, किडनीचे विकार, ह्रदयविकार सर्वच लक्षात घेणे गरजेचे आसते .

Levothyroxin हे औषध दिले जाते . (DOSE 12.5 mcg to 300mcg/day ) बदल दिसायला ४/६ आठवडे लागतात .एकदा TSH चा रिपोर्ट हवातसा आला की ४/६ महिन्यांनी टेस्ट केली तरी चालते.

ही गोळी घेण्याची पद्धत महत्वाची. सकाळी उपाशीपोटी घेणे व त्यानंतर अर्धा पाऊण तासाने नाश्ता चहा/काँफी इष्ट. तर ही उत्तम प्रकारे लागू पडते . शक्यतो ब्रॅण्ड व लँब तीच ठेवावी असे केल्यास रिपोर्ट मधे खूप तफावत येत नाही. ही गोळी बरेचदा कायम घ्यावी लागते. गर्भारपणातही सेफ आहे.

वजन व रिपोर्ट बघून डोस मधे /मात्रे मधे बदल केले जातात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग बदल करावा, उगाच गोळी बंद करु नये . रिपोर्ट नॉर्मल म्हणजे डोस बरोबर आहे, चालू ठेवा, असा संदेश असतो.