देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ५४४ जागांसाठी एकूण ७ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत अनेक राज्यांत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. तर काही मतदान केंद्रे हे महिला केंद्रीत ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार, एकट्या गुवाहाटीत जवळपास १०० पेक्षा जास्त मतदान केंद्र हे महिला केंद्रीत आहेत. म्हणजेच, या मतदान केंद्रावर फक्त महिला राज असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार परिषदेला संबोधित करताना, गुवाहाटीचे पीठासीन अधिकारी सुमित सट्टावन म्हणाले, गुवाहाटी मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत आणि येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Shreyanka Patil : आरसीबीची चाहती बनली आरसीबीचीच स्टार! कोण आहे २१ वर्षीय श्रेयंका पाटील? जाणून घ्या, तिचा रोमांचक क्रिकेटचा प्रवास

गुवाहाटी मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यांत म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. कामरूप मेट्रोपॉलिटन, कामरूप आणि गोलपारा जिल्ह्यात २ हजार १८१ मतदान केंद्रे आहेत. तर, यामध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त मतदान केंद्र हे महिला केंद्रीत आहेत. “आमच्याकडे १०२ सर्व महिला मतदान केंद्रे असतील. या बूथचे सर्व कर्मचारी महिला असतील. शिवाय, आमच्या मतदारसंघात १५ मॉडेल मतदान केंद्रे देखील असतील”, असं सट्टावन म्हणाले.

गुवाहाटी लोकसभा मतदारसंघात १० विधानसभा मतदारसंघ आहेत. कामरूप महानगरातील पाच, कामरूपमध्ये तीन आणि गोलपारामधील दोन. “आमच्याकडे २० लाख १९ हजार ४४४ एकूण मतदार आहेत. यापैकी ९ लाख ९३ हजार २६८ पुरुष मतदार आणि १० लाख २६ हजार ११८ महिला मतदार आहेत. तर, ५८ तृतीयपंथीय मतदार आहेत. नवीन मतदार अर्ज विचारात घेतल्यावर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे”, असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> ‘१६ वर्षांच्या’ मुलीने सुरू केली स्वतःची कंपनी! आता करते ‘१०० कोटींची’ उलाढाल! कोण आहे, पाहा…

सट्टावन म्हणाले की मतदानाच्या सराव दरम्यान सुमारे ९ हजार नागरी सेवक व्यस्त असतील, तसेच मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी असतील. “आमच्याकडे २५ फ्लाइंग स्क्वॉड्स, १५ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स आणि १५ व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम्स असतील जे आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी कार्यरत असतील”, असे कामरूप महानगरचे जिल्हा आयुक्त सट्टावन म्हणाले.

तेजपूरमध्येही महिला मतदारांची संख्या अधिक

तेजपूर येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, सोनितपूरचे पीठासीन अधिकारी देबा कुमार मिश्रा म्हणाले की एकूण १५० मतदान केंद्र फक्त महिलाच व्यवस्थापित करतील. आमच्याकडे संपूर्ण मतदारसंघात एकूण १ हजार ८७८ मतदान केंद्रे असतील. या बूथवर १६ लाख २५ हजार ३६४ लोक मतदानाचा हक्क बजावतील. सोनितपूर मतदारसंघात ४ लाख ७३ हजार ०३७ पुरुष आणि ४ लाख ७८ हजार २४८ महिला मतदार आहेत.”

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In this city over 100 all women poll booths for lok sabha elections sgk
First published on: 18-03-2024 at 16:49 IST