“ मावशी, मला महत्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे. मी तुझ्या क्लिनिक मध्ये येऊ का?” प्रतिमानं विचारलं. मावशीनं ‘हो’ म्हटल्यामुळे प्रतिमाला बरं वाटलं. काही गोष्टी ती आई बाबांशीही बोलू शकत नव्हती. मावशी ‘चाईल्ड सायकॉलॉजिस्ट’ असल्यानं ती आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकेल याची तिला खात्री होती. तिच्या ऑफिसमधून ती लवकर निघाली आणि मावशीच्या क्लिनिकला पोहोचली.

“ प्रतिमा, तू काय घेणार, चहा, कॉफी की ज्यूस सांगू?”

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?

“ मावशी, मला काहीच नको, फक्त तुझा वेळ दे, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे.” तिनं लगेच बोलायलाच सुरुवात केली.

“ मावशी, सोनू आता चार वर्षाचा झाला. बऱ्याच गोष्टी त्याला आता समजू लागल्या आहेत. मी दिवसभर ऑफिसमध्ये असते. माझ्या सासूबाई त्याला सांभाळतात. त्यांची त्याला खूप सवय झाली आहे. त्यामुळं तो त्यांना सोडून माझ्याकडं पटकन येतच नाही. आशिषला ‘वर्क फ्रॉम होम’ असतं त्यामुळं तो ही घरात असल्यानं त्याचीही त्याला सवय झाली आहे. फक्त माझ्याकडं तो येत नाही. त्याच्या मनातून आई हरवून जाईल का गं? सर्वांच्याच घरात थोडेफार मतभेद असतात. तसंच आमच्याही घरात आहेत. आशिषला बायकोपेक्षा आई जास्त प्रिय आहे. बऱ्याचदा आमच्या भांडणामध्ये ‘एकवेळ तुझ्यापासून दूर होईन, पण मी माझ्या आईपासून कधीही दूर जाणार नाही.’ असं तो म्हणतो. अगदीच आमच्या दोघांचं जमलचं नाही आणि वेगळं होण्याचीच वेळ आलीच तर माझा सोनू माझ्याकडं राहील का? माझ्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीची घटस्फोटाची केस चालू आहे,पण तिच्या सासूनं मुलीला स्वत: जवळ ठेवून घेतलं आहे. नवरा कस्टडी द्यायला तयार नाही. त्यांनी त्या मुलीला काय शिकवलं ते माहिती नाही, पण आता कोर्टमध्ये गेल्यावर ती मुलगी आईशी बोलायलाही तयार नाही. मावशी माझ्या बाबतीत असं काही होणार नाही ना? तू या क्षेत्रात काम करतेस म्हणून तुला विचारते आहे. मुलं खरंच आपल्या आईपासून एवढ्या दूर जातात? लहानपणी आईपासून एकही क्षण दूर न होणारी मुलं अशी आईला विसरतात?”

हेही वाचा : शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान

प्रतिमाच्या डोक्यात काय चाललं आहे. हे मावशीच्या लक्षात आलं. इतरांचे अनुभव बघून स्वतःच्याही बाबतीत असंच घडेल असा विचार मनात आणून ओव्हर थिंकिंग करण्याचा तिचा स्वभाव त्यांना चांगलाच माहिती होता. तिच्या डोक्यातील हे खुळं काढून टाकणं गरजेचं होतं.

“प्रतिमा, तुझ्या आईनंही नोकरी केली, तू सुद्धा तुझ्या आजीकडं वाढली आहेस. लहानपणी तुला फक्त आजीच हवी असायची, पण तू तुझ्या आईपासून दूर झालीस का? आईची जागा वेगळी असते आणि आईबद्दलचं नैसर्गिक प्रेमही असतं. सोनू तुला विसरेल. तो तुझ्यापासून दूर जाईल असा विचार का करतेस? काही कुटुंबात वाद असतात. मुद्दाम एका पालकापासून दुसऱ्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मुलांच्या मनात काहीही भरवून देण्याचा प्रयत्न केला तरीही मुलांच्या मनातील आई व वडिलांबद्दलचे बद्दलचे प्रेम आणि नैसर्गिक ओढ कायम असते. काही वेळा मुलं ज्या पालकाकडं राहात असतं. त्याचा कळत-नकळत मुलावर प्रभाव अधिक असतो. त्यामुळं मुलं बोलत नाही. आपल्या भावना व्यक्त करत नाही, पण आम्ही मुलांची सायकॉलॉजी ओळखतो. मुलांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर केले तर त्यांच्या अंतर्मनातील भाव ओळखता येतात.

हेही वाचा : “एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग

प्रतिमा,तू सोनूला फार वेळ देऊ शकत नसलीस तरी त्याला क्वालिटी टाइम दे. जेव्हा तू घरी पोहोचशील तेव्हा काही वेळ तरी त्याच्यासोबत खेळत जा. सुट्टीच्या दिवशी घरातील काही कामं राहिली तरी चालतील, पण त्याला तुझ्या सहवासात राहता येईल असं नियोजन कर. आई हे संस्कारांचं पहिलं व्यासपीठ असतं. तू तुझं काम करताना, स्वयंपाक करतानाही त्याचा वावर तुझ्या भोवती असू दे. तो त्रास देतो म्हणून सासूबाईंनीचं सांभाळावं असं करू नकोस. मुलं सांभाळण्यासाठी सपोर्ट सिस्टीम असली तरीही मुलांसाठी आई वडिलांनी वेळ देणं हेही खूप महत्वाचं असतं. तू त्याला दूर करशील, तर आणि तेव्हाच तो तुझ्यापासून दूर जाईल. म्हणूनच तुझ्या वेळेचं नियोजन कर. त्याला वेळ देत रहा आणि नको ते विचार करणं सोडून दे, भविष्य काळात असं घडेल याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानातील आनंद शोधण्याचा प्रयत्न कर.”

मावशीनं सांगितलेली चाईल्ड सायकॉलॉजी प्रतिमाच्या लक्षात आली आणि तिच्या मनावरचं ओझं उतरलं. सोनूला कसा वेळ देता येईल याचं नियोजन करीतच ती घरी पोहोचली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)