बनावट ‘ट्विटर’ अकाऊंटमुळे पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खान याच्या भविष्याबाबतच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अकाऊंटवर विश्वचषक संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, अशी सूचना युनिसला करण्यात आली आह़े फलंदाजीत चाचपडणाऱ्या या ३७ वर्षीय खेळाडूवर माजी खेळाडूंनी सडकून टीका केली आहे आणि तसे जाहीर वक्तव्येही त्यांच्याकडून करण्यात आली आहेत.
या टीकेच्या भडिमारात युनिसच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून एका अवलियाने निवृत्तीची घोषणा केली. त्याने पोस्ट केले की, ‘‘२०१५च्या विश्वचषकानंतर मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असून कसोटी क्रिकेट खेळत राहीन.’’
‘‘माझे कोणतेही ट्विटर अकाऊंट नसून हे वृत्त चुकीचे आहे. फॉर्म मिळविण्यासाठी कठोर मेहनत घेत असून भविष्याबाबत अद्याप विचार केलेला नाही,’’ असे युनिसने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2015 रोजी प्रकाशित
कपशप : युनिसच्या भविष्याबाबत गोंधळ
बनावट ‘ट्विटर’ अकाऊंटमुळे पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खान याच्या भविष्याबाबतच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

First published on: 26-02-2015 at 12:04 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion about the future of younis