क्रिकेटच्या मैदानात ‘मेक्सिकन वेव्ह’ साऱ्यांनीच अनुभवल्या असतील, पण त्याच वेळी मैदानात खेळणारे खेळाडू मेक्सिकन पदार्थाचे चाहते असतील तर.. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा मेक्सिकन पदार्थाचा चाहता आहे. त्यामुळे थोडासा निवांत वेळ मिळाल्यावर धोनीने सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांना बरोबर घेऊन एक मेक्सिकन हॉटेल गाठले आणि पदार्थाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी ‘बुस्ट’ नावाच्या ज्यूसचा आनंद लुटला. जेव्हा हे तिघे हॉटेलमध्ये असल्याची बातमी पसरली तेव्हा चाहत्यांनी एकच गर्दी केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
धोनीने मेक्सिकन पदार्थाचा आस्वाद घेतला
क्रिकेटच्या मैदानात ‘मेक्सिकन वेव्ह’ साऱ्यांनीच अनुभवल्या असतील, पण त्याच वेळी मैदानात खेळणारे खेळाडू मेक्सिकन पदार्थाचे चाहते असतील तर..

First published on: 20-02-2015 at 12:50 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni test mexican food