सट्टेबाजारात आता जोरदार उलाढाल होऊ लागली आहे. पहिल्या पाचामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड यांना सट्टेबाजांनी झुकते माप दिले आहे. या संघांच्या भावामध्ये चढउतार होत असला तरी ऑस्ट्रेलिया विश्वविजेता होणार, याबद्दल सट्टेबाजार आजही ठाम आहे. आयत्या वेळी अनेक गणिते चुकतात. एखादा सामनाही सट्टेबाजारांची गणिते चुकवितो. मात्र सलग दोन सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून ‘ब’ गटात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताचा भाव आता चांगलाच वधारला आहे. येत्या शनिवारी कमकुवत संयुक्त अरब अमिरातीबरोबरच्या सामन्यात सट्टेबाजारांनी भारताला फक्त १० पैसे भाव देऊन सहज विजय मिळणार हे स्पष्ट केले आहे. अनपेक्षित निकाल लागलाच तर पंटर्सची धम्माल होणार आहे. शनिवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याकडेही सट्टेबाजाराचे लक्ष आहे. या सामन्यातील अनपेक्षित निकालाने सट्टेबाजाराची अनेक गणिते बदलणार आहेत. अर्थात सट्टेबाजांनी ऑस्ट्रेलियाला (६० पैसे) झुकते माप दिले आहे. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड तसेच आर्यलड आणि संयुक्त अरब अमिराती या लिंबू-टिंबू संघात होणाऱ्या सामन्यांबाबत सट्टेबाजारात फारशी उत्सुकता नाही. मात्र पंटर्सच्या दृष्टीने हे सामनेही महत्त्वाचे आहेत. सट्टय़ासाठी अशा सामन्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत असतो, असे सट्टेबाजारात बोलले जाते. भारतीय सट्टेबाजारातही अशा सामन्यांना चांगलेच पंटर्स लाभतात.
सामन्याचा भाव
अफगाणिस्तान : ६० पैसे; स्कॉटलंड : सव्वा रुपया
आर्यलड : ३० पैसे; अरब अमिराती : साडेतीन रुपये
निषाद अंधेरीवाला
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2015 रोजी प्रकाशित
सट्टे पे सट्टा : लिंबू-टिंबूंबाबत अनुत्सुकता
सट्टेबाजारात आता जोरदार उलाढाल होऊ लागली आहे. पहिल्या पाचामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड यांना सट्टेबाजांनी झुकते माप दिले आहे. या संघांच्या भावामध्ये चढउतार होत असला तरी ऑस्ट्रेलिया विश्वविजेता होणार, याबद्दल सट्टेबाजार आजही ठाम आहे. आयत्या वेळी अनेक …
First published on: 25-02-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odds in favour of ireland against uae