‘दगडावर दगडी सात’ म्हणजेच ‘लगोरी’. ठाण्यात लगोरी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळविण्यात येत आहे. नागोठणे येथे आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला आहे.
महाराष्ट्र लगोरी असोसिएशनने पुढाकार घेत भारत लगोरी असोसिएशनच्या माध्यमातून ठाण्यात ही चार दिवसीय आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने केनियाचा २५-९, ८-२ पराभव करत पुढच्या फेरीत आगेकूच केली आहे. यावेळी आंतराष्ट्रीय लगोरी असोसिएशनचे सचिव संतोष गुरव म्हणाले की, या स्पर्धेमागे लगोरी खेळाला आंतराष्ट्रीय स्तरावर बळकटी आणि प्रोत्साहन देणे हे उद्दीष्ट आहे. अशा नामशेष होणाऱया खेळांचे अस्तित्व टीकविण्यासाठी अशा स्पर्धा होत राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2013 रोजी प्रकाशित
ठाण्यात आंतराष्ट्रीय ‘लगोरी’ स्पर्धा; भारताची केनियावर मात
'दगडावर दगडी सात' म्हणजेच 'लगोरी'. ठाण्यात लगोरी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळविण्यात येत आहे. नागोठणे येथे आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला आहे.

First published on: 12-12-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2nd international lagori series kicks off