चेन्नई, कोलकाता आणि इंदूर असे तिन वन-डे सामने जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिकेत ३-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं २९४ धावांचं आव्हान भारताने ५ गडी राखुन पूर्ण केलं. सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत सामन्यावर भारताचं वर्चस्व कायम राहील याची काळजी घेतली. या खेळीत रोहीत आणि अजिंक्यने आपापली अर्धशतक साजरी केली. मात्र यानंतर लागोपाठ विकेट गेल्याने भारताच्या गोटात काहीकाळ चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं. मात्र हार्दिक पांड्याने सर्वप्रथ कर्णधार विराट कोहली आणि त्यानंतर मनिष पांडेच्या सहाय्याने अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताच्या फलंदाजांना लवकर माघारी धाडण्याचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना यश आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधीक २ बळी घेतले. तर कुल्टर नाईल, रिचर्डसन आणि अॅगरने प्रत्येकी १-१ बळी मिळवला.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून
  • ५ सामन्यांची मालिका भारताच्या खिशात, मालिकेत ३-० ने आघाडी
  • विजयासाठी आवश्यक धावांची पूर्तता पांडे-धोनीकडून पूर्ण, भारताचा ५ गडी राखून विजय
  • चौफेर फटकेबाजी करत पांड्याच्या ७८ धावा, मनिष पांडेची पांड्याला उत्तम साथ
  • विजयासाठी अवघ्या १० धावा हव्या असताना हार्दिक पांड्या माघारी, भारताला पाचवा धक्का
  • हार्दिक पांड्या आणि मनिष पांडेमध्ये पाचव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी
  • पाठोपाठ केदार जाधव अवघ्या २ धावांवर माघारी, भारताला चौथा धक्का
  • मोठा फटका खेळण्याच्या नादात कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची अर्धशतकी भागीदारी
  • कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या साथीने भारताचा डाव सावरला
  • पाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेला अजिंक्य रहाणे पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद
  • मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहीत शर्मा माघारी, भारताला पहिला धक्का
  • पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये १३९ धावांची भागीदारी
  • पाठोपाठ अजिंक्य रहाणेनेही झळकवलं अर्धशतक, सलग दुसऱ्या सामन्यात अजिंक्यचं अर्धशतक
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, रोहीत शर्माचं अर्धशतक
  • रोहीत शर्मा-अजिंक्य रहाणेकडून भारतीय डावाची सावध सुरुवात
  • स्टॉयनिसच्या फटकेबाजीमुळे कांगारुंची मजल २९३ धावांपर्यंत, भारताला २९४ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांकडून आश्वासक खेळ, कांगारुंना ३०० धावसंख्येच्या आत थांबवण्यात यश
  • बुमरहाच्या गोलंदाजीवर मनिष पांडेकडून हँडस्कॉंबचा अफलातून झेल, कांगारुंचे ६ गडी माघारी
  • स्टॉयनिसची झुंज सुरुच, मात्र एका बाजूने विकेट जाण्याचं सत्र सुरुच
  • ट्रॅविस हेडचा त्रिफळा उडवत जसप्रीत बुमराहचा कांगारुंना पाचवा धक्का
  • काही क्षणांतच धोकादायक ग्लेन मॅक्सवेल चहलच्या गोलंदाजीवर यष्टीचीत, ऑस्ट्रेलियाचे ४ गडी माघारी
  • कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना स्टिव्ह स्मिथ माघारी, कांगारुंना तिसरा धक्का
  • कर्णधार स्टिव्ह स्मिथचं अर्धशतक, ७१ चेंडुत ६३ धावांची खेळी
  • कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शतकवीर फिंच माघारी, फिंचची १२४ धावांची खेळी, कांगारुंना दुसरा धक्का
  • स्मिथ आणि फिंचमध्ये १५४ धावांची भागीदारी, कांगारुंची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवाणारे भारतीय गोलंदाज हतबल
  • अॅरोन फिंचचं धडाकेबाज शतक, कांगारुंची धावसंख्या २०० पार
  • फिंचची आक्रमक खेळी सुरुच, मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी
  • दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी, कांगारुंचा डाव सुस्थितीत
  • दुसऱ्या बाजूने कर्णधार स्टिव्ह स्मिथचीही फिंचला उत्तम साथ
  • मिळालेल्या संधीचं सोनं करत फिंचचं अर्धशतक साजरं
  • अॅरोन फिंचकडून भारतीय गोलंदाजांवर आक्रमण सुरुच, फिरकी गोलंदाजांचीही केली धुलाई
  • दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी
  • ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, पांड्याने वॉर्नरला धाडलं माघारी
  • धावफलक हलता ठेवण्यात दोन्ही फलंदाजांना यश, एकही विकेट न गमावता धावसंख्या ५० पार
  • अॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नरची सावध सुरुवात
  • भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत
  • ऑस्ट्रेलिया संघात दोन महत्वाचे बदल, अॅरोन फिंचला संघात स्थान
  • तिसऱ्या सामन्यात कांगारुंनी नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय