मात्र चाकरमान्यांच्या मार्गात खड्डय़ांचे विघ्न

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर रायगड जिल्’ाात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र महामार्ग दुरुस्तीचे काम अद्याप पुर्ण झाले नसल्याने चाकरमान्यांच्या मार्गात खड्डय़ांचे विघ्न कायम राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक सुरळीत राहावी यासाठी रायगड पोलिसांनी व्यापक तयारी केली असून खारपाडा ते कशेडी दरम्यान १६ ठिकाणांवर ५० सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव आता अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई आणि ठाण्यातील लाखो चाकरमानी या सणाच्या निमित्ताने कोकणात दाखल होणार आहे. या पाश्र्वभुमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर येत्या २ सप्टेंबर पासून मोठा पोलीस बंदोबस्त तनात केला जाणार आहे. रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत चार ठिकाणी आपत्कालिन मदत केंद्र तर पाच ठिकाणी विशेष पोलीस सहाय्यता केंद्र उभारली जाणार आहे.

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी १ पोलीस अधिक्षक, १ अप्पर पोलीस अधिक्षक, ९ उपअधिक्षक, १६०० पोलीस कर्मचारी, ७०० होमगार्ड, राज्यराखीव दल, शीघ्र कृतीदल, महामार्ग पोलीस असा व्यापक बंदोबस्त तनात केला जाणार आहे. वाहतुक नियंत्रणासाठी १८ जीप, २० मोटरसायकल, ५४ वॉकी टॉकी, २० बिनतारी संदेश सेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी १६ ठिकाणी ५० सिसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

मुंबई- गोवा महामार्गावर वडखळ, माणगाव, कोलाड ही वाहतुक कोंडीची प्रमुख केंद्र आहेत ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणांवर विशेष उपाय योजना केल्या जात आहेत. या परिसरात ओव्हर टेकींग करता येऊ नये यासाठी रस्त्याच्या मध्ये दुभाजक उभारली जाणार आहेत. तर या परिसरात वाहने थांबू नये यासाठी दोन्ही बाजूला बारकेड्स उभारली जाणार आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील उपस्थित होते.

एसटीसाठी पर्यायी स्थानके :

कोकणात जाणाऱ्या माणगाव, नागोठणे, वडखळ आणि रामवाडी बस स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांना प्रवेश करण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. बस स्थानकात येणाऱ्या- जाणाऱ्या गाडय़ांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रायगड पोलीसांनी हा निर्णय घेतला आहे. मुळ बसस्थानकापासून १०० मिटरच्या जाणाऱ्या मार्गावर मोकळी जागा शोधून तात्पुरती पर्यायी स्थानके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

आपत्ती  व्यवस्थापन केंद्र :

महामार्गावर हमरापुर फाटा, कांदळेपाडा, वाकण फाटा, नाते िखड या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारली जाणार आहेत. या ठिकाणी ४ क्रेन्स, ४ जेसीबी, ४ रुग्णवाहिका, तनात ठेवण्यात येणार आहेत.

 वाहतूक  नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग :

१. खारपाडा ते वडखळ दरम्यान वाहतुक कोंडी झाल्यास वाहतुक आपटा-रसायनी-दांडफाटा-खालापुर-पाली माग्रे वाकण अशी वाहतुक वळवण्यात येईल.

२. वडखळ ते नागोठणे दरम्यान वाहतुक कोंडी झाल्यास वाहतुक वडखळ पेझारी माग्रे नागोठणे वाकण अशी वळवण्यात येईल.

३. वाकण फाटा ते कोलाड वाहतुक कोंडी झाल्यास वाहतुक कोलाड-रोहा-भिसेिखड-पोयनाड माग्रे वडखळकडे वळवली जाईल.

४.  कोलाड पट्ट्यात वाहतुक कोंडी झाल्यास वाहतूक वाकण- रवाळजे-निजामपुर माग्रे मागगावकडे वळवण्यात येईल

५. कशेडी घाटात वाहतुक कोंडी झाल्यास वाहतुक राजेवाडी-टोलनाका-शिरगाव-फाळकेवाडी-नातुनगरमाग्रे खेडकडे वळवण्यात येणार आहे.