बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही ट्विटरवर एक कोटींपेक्षा जास्त चाहते असलेल्या व्यक्तींपैकी आहे. तिचे केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही बरेच चाहते आहेत. त्यामुळेच प्रियांका आता ट्विटरवर सर्वात जास्त फॉलो केली जाणारी बॉलीवूड सेलिब्रेटी बनली आहे. त्याचसोबत न्यूयॉर्क येथील ट्विटरच्या मुख्यालयात जाणारी पहिली बॉलीवूड सेलिब्रेटी ठरली आहे. खरं तर प्रियांकाला २०१० सालीच ट्विटरच्या मुख्यालयात येण्याचे आमंत्रण मिळाले होते. मात्र, त्यावेळी तिला तेथे जाता आले नव्हते. पण यावेळी प्रियांकाने ट्विटरच्या मुख्यालयाला भेट दिलीच त्याचसोबत लाइव्ह चॅट सेशनमध्येही सहभाग घेतला.
लाइव्ह चॅट सेशन दरम्यान प्रियांकाला तिचे ट्विटर अकाउंट कोण हाताळतं असा प्रश्न करण्यात आला होता. याचे उत्तर देताना प्रियांका म्हणाली की, लोकांना वाटतं की माझं ट्विटर अकाउंट माझी टीम हाताळते. पण तसं नाहीए. माझं ट्विटर अकाउंट मी स्वतः हाताळते. ट्विटरवर अकाउंट सुरु केल्यापासून मी स्वतःच त्यावर ट्विट करत असते. अगदी सामान्य व्यक्तिंप्रमाणेच मी ट्विट करते. मी कित्येकदा चंद्राचा फोटो काढण्याचा प्रयत्न करते. पण माझ्या मोबाइलचा कॅमेरा थोडा ठीक नसल्यामुळे त्यात चंद्र धूसर दिसतो. माझ्या मनात जे काही येत ते मी ट्विटरवर लिहते. तसेच मला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा माझे इतर सोशल अकाउंटही हाताळते. प्रियांका चोप्राचे ट्विटरवर १.४ कोटी फॉलोअर्स आहेत. केवळ ट्विटरचं नाही तर इन्स्टाग्रामवरही तिच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटीच्यावर आहे. इन्स्टाग्रामवर एक कोटी फॉलोअर्स झाल्यानंतर प्रियांकाने व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले होते.

Thankful for our 10 million family on Instagram.. Lots of love and gratitude! #10MforPriyankaonInsta

A video posted by Priyanka Chopra (@priyankachopra) on