कुतूहल: पेशींमधील रासायनिक प्रक्रिया
आपलं शरीर म्हणजे जणू एखादा रासायनिक कारखानाच म्हणायला हवा. एखाद्या रासायनिक कारखान्यात घडाव्यात इतक्या विविध प्रकारच्या आणि इतक्या क्षमतेने आपल्या शरीरात व शरीरातल्या सूक्ष्म पेशींमध्ये रासायनिक अभिक्रिया अविरतपणे घडत असतात. आपल्या शरीरामध्ये असलेल्या पेशीतल्या घटकांची आपण तीन गटांमध्ये विभागणी करू शकतो. हे तीन गट म्हणजे पाणी, असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक. पेशीत असलेल्या सेंद्रिय घटकांमध्ये कबरेदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि डीएनए, आरएनए यांसारखी न्युक्लिक आम्ले यांचा समावेश होतो; तर असेंद्रिय घटकांमध्ये निरनिराळे क्षार, आयन यांचा समावेश होतो. पेशींचा जवळपास ७० टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. पेशींच्या प्रकारानुसार त्यामध्ये असलेले पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होते. आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशींमध्ये सुमारे ६० टक्के भाग इतक्या प्रमाणात पाणी असते, तर स्नायूंमध्ये पाण्याचे प्रमाण ८० टक्के असते.
हे सगळे घटक पेशींकडून वापरले जातात आणि पचलेल्या अन्नाद्वारे ते पेशींकडून पुन:पुन्हा मिळवलेही जातात. थोडक्यात, शरीरातल्या पेशींमार्फत या घटकांचे चक्रीकरण अव्याहतपणे सुरूच असते. या चक्रीकरणात रासायनिक अभिक्रियांची भूमिका खूप महत्त्वाची असते. या सगळ्या प्रक्रियांमधून टाकाऊ पदार्थही निर्माण होत असतात. हे टाकाऊ पदार्थ, तसेच पेशीमध्ये निर्माण होणारे अतिरिक्त पदार्थ पेशीतून बाहेर टाकले जातात. पेशीआवरणाच्या वैशिष्टय़पूर्ण संरचनेमुळे विशिष्ट प्रमाणात विशिष्ट घटक पेशीत ठेवणे किंवा पेशीबाहेर टाकणे शक्य होते. पेशींमधून बाहेर टाकलेले हे पदार्थ उत्सर्जन यंत्रणेमार्फत शरीराबाहेर टाकले जातात.
एखाद्या पेशीच्या रासायनिक स्वरूपाचे संपूर्ण स्पष्टीकरण देणे कठीण आहे. विविध प्रकारच्या पेशींपकी अतिशय साधी रचना असणाऱ्या जीवाणूंच्या पेशीही रासायनिकदृष्टय़ा क्लिष्ट आहेत. त्यांच्यात जवळपास पाच हजार वेगवेगळ्या प्रकारचे रेणू असतात. अर्थातच, आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये त्याहूनही कितीतरी जास्त प्रकारचे रेणू असतात. पेशीचे आवरण हे रासायनिक पदार्थासाठी संवेदनक्षम असते. पेशी आवरणाच्या या संवेदन क्षमतेमुळेच कुठलीही चेतासंस्था नसलेल्या जीवाणू, आदिजीव यांसारख्या एकपेशीय सूक्ष्मजीवांना कोणत्या दिशेने हालचाल करायची हे समजू शकते. यामुळेच ते आमिनो आम्ले, शर्करा यांसारख्या पदार्थाकडे आकर्षलेि जातात आणि धोकादायक असलेल्या पदार्थापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.

प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

प्रबोधन पर्व:  प्रचाराच्या गुलामीमुळे मानवप्रतिष्ठा संकटात
‘दिवसेंदिवस साऱ्या देशाची परिस्थिती ही हुकूमशाहीकडे वेगाने जात आहे. लोक असे म्हणतात की, रशियासारखी हुकूमशाही येथे येत आहे. हुकूमशाही कोणतीही असो, कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्याने मनुष्य प्रचाराचा कसा गुलाम बनून जातो हे आज आपल्याला दिसून येत आहे. आजकाल सरकारीकरणाचा प्रचार होत आहे. तेच वारे आज वाहत असल्यामुळे सर्वच आवश्यक वस्तूंच्या सरकारीकरणाची मागणी केली जात आहे.. केवळ अन्नधान्याचेच सरकारीकरण करून भागणार नाही तर सर्वच वस्तूंचे सरकारीकरण केले पाहिजे, असे एका मोठय़ा काँग्रेसी नेत्याने नुकतेच म्हटले आहे. लोकांना असे वाटते की, सरकारीकरण हा सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. याचबरोबर लोक असेही म्हणतात की, आपले हे सरकार सोने जरी दाती धरील तरी त्याची माती होईल.. सरकारीकरणाची अशी ही अवस्था आहे.. लोकांचा कलही सरकारीकरणाकडेच आहे. आज देशात अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे की, काही मूठभरच लोक सत्ताधारी असावेत आणि बाकीचे सर्व गुलाम! मानवाच्या प्रतिष्ठेचा जो भाव निर्माण व्हावयास हवा होता तो कुठे आहे?’’
माधव सदाशिव गोळवलकर ऊर्फ गुरुजी संघ-कार्यकर्त्यांना (‘श्री गुरुजी समग्र दर्शन, खंड- दोन’) उद्देशून केलेल्या भाषणात म्हणतात – ‘‘अशा या अवस्थेत माणसाची तसेच राष्ट्राची अस्मिता आणि चारित्र्य जागृत करण्यासाठी तसेच राष्ट्राची प्रतिष्ठा सर्व प्रकारे अक्षुण्ण राखण्यास समर्थ अशा समाजाची संघटित शक्ती निर्माण करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आपल्या कार्याचा विस्तार आणि त्याचे दृढीकरण यातूनच हे शक्य होऊ  शकेल. यासाठी एकेका व्यक्तीस आपल्या संपर्कात आणून कार्यासाठी उभे करावे लागेल. मनुष्य किती लाचार बनतो याचा अनुभव मी घेतला आहे.. माणसाची आज ही अशी अवस्था झाली आहे. स्वार्थासाठी तो लांगूलचालन करीत आहे. समाजाची ही अवस्था बदलावयाची तर त्याला आत्मविश्वासयुक्त आणि स्वाभिमानी बनवावे लागेल. संघटित सामथ्र्य असेल तरच समाज सार्वभौम होऊ  शकतो.’’

मनमोराचा पिसारा:  तू असा.. मी अशी!
मानसी, तुझ्याबद्दल मी काही तरी विशेष निरीक्षण केलंय, ते खूप र्वष तुला सांगायचं राहून गेलं. तुला कदाचित आवडणार नाही, आपण स्वत:ला स्वत:बद्दल जे समजलंय ते सांगितलं नाही, ते स्वीकारलं नाही तर बदल कसा शक्य होईल? सांगू ना? मानस म्हणाला, मानसीनं त्याच्याकडे न पाहता, मानेनंच ‘हो’ म्हटलं.
‘हे बघ, असंय तुझं! तू स्वतमध्ये गुंतलेली असतेस. पटकन कोणाबरोबर संवाद करत नाहीत. लोकांच्यात मिसळून राहायला आवडत नाही. कसला न कसला तरी विचार करीत असतेस. तुला फार मित्रपरिवार नाहीये! तू कसली चिंता करतेस कोण जाणे? मानस रोखून पाहत म्हणाला.
मानसीनं नजरेला नजर न देत स्मित करीत म्हटलं, ‘उगीच काय? काही तरी बोलू नकोस. तुझ्यासारखे ढीगभर मित्र नाहीत, ना माझं नेटवर्क नाही. मी लोकांशी संवाद सुरू करणं टाळते हे खरंय, पण एकदा संवाद सुरू झाला की, बोलू लागले. मला खूप मित्र-मैत्रिणी नसल्या तरी, मोजक्या व्यक्तीबरोबर अगदी छान आणि अर्थपूर्ण मैत्री आहे.’ मानसी बोलता बोलता सैलावून बसली. ..आणि मी कसलीही चिंता करीत नाही. तेव्हा मला चिंतातुर जंतू वगैरे नावं ठेवू नकोस. मी चिंता नाही, चिंतन करते. हे मात्र खरंय. ‘तेच तर म्हणतोय मी!’ मानस आक्रमकपणे म्हणाला, ‘सगळ्यांना वाटतं की तू फार आखडू आहेस. फार शिष्ट आहेस..
‘हं, हो आणि लोकांना असंही वाटतं की मला फार ‘इगो’ आहे. मी गर्विष्ठ आहे. हे तर मी नेहमीच ऐकत आले आहे. लोकांचा निष्कारण गैरसमज होतो माझ्याबद्दल! कुठे आणि कशाला लोकांचे समज-गैरसमज दूर करीत बसू? मानसी हसत म्हणाली, आणि तुझ्याबद्दल काय म्हणतात? माहित्येय ना? बडबडय़ा आहे, सतत मित्रांबरोबर टाइमपास करतो, शाब्दिक कोटय़ा करायच्या आणि कशाबद्दलही सीरियसनेस नाही!!’ मानस म्हणाला, ‘हो माहित्येय, पण मी तसा नाहीये. मला लोकांशी कनेक्ट करायला आवडतं. हास्यविनोदात रस आहे आणि आय गो विथ फ्लो..’ पण मी सांगतो तुला मानसी, मी स्वत:ला अ‍ॅक्सेप्ट केलंय. मी जसा आहे तसं! मजेत राहतो.
‘आणि मीसुद्धा.. हे बघ तू बहिर्मुखी आहेस आणि मी अंतर्मुखी आहे. मी इंट्राव्हर्ट, तू एक्स्ट्रोव्हर्ट!! मानस, इंट्राव्हर्ट लोकांबद्दल सहसा लोकांचे असेच गैरसमज होतात. लोकांचं काय रे? लोकांना लेबलं लावून टाकायला आवडतं. शिष्ट आहे, रिझव्‍‌र्ह आहे! ’- मानसी. प्रत्येक व्यक्तीचा कम्फर्ट झोन असतो. आपल्या स्वस्थ अवकाशात, आपण मजेत असतो. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची काही शक्तिस्थानं असतात. तर काही त्रुटी असतात-  मानस.
..आपल्या त्रुटी कमी करायला हव्यात यात शंकाच नाही. त्याबरोबर आपल्या शक्तिस्थानांचा पुरेपूर उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या शक्तिस्थानांमधून कौशल्य निर्माण होतात. उदा. तुला लोकांशी बोलायला आवडतं तर तू संवादकौशल्यात निपुण व्हायला हवंस. मानसी म्हणाली.
आणि तू स्वत:विषयी, महत्त्वाच्या गोष्टीविषयी चिंतन करून अधिक वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ व्हायला हवं. वाचन, मनन, नियोजन अशा गोष्टीत मन रमवलं पाहिजेस.’ मानस म्हणाला. याचा अर्थ आपण कसे नाही! किंवा आपण कसे असायला हवे होतो? कसे असतो तर बरं झालं असतं. असा निर्थक विचार न करता जसे आहोत तसे स्वीकारून आत्मविकास साधला पाहिजे. ‘अगदी बरोब्बर बोललास मानस! तसं म्हटलं तर प्रत्येकातच थोडा अंतर्मुख आणि बहिर्मुखपणा असतोच की! होय की नाही?’ मानसी म्हणाली..  दोघेही खळखळून हसले.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com