scorecardresearch

रेल्वे

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
central railway, mumbai to gorakhpur
मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.

dombivli railway station marathi news
इंडिकेटर यंत्रणेतील गोंधळामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली

सुदैवाने लोकल कल्याणच्या दिशेने फलाटवरून संथगतीने निघाली होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

Passenger sleeps in makeshift hammock in overcrowded Brahmaputra Mail Railway Pics video
कोणी बेडशीटचा बांधला झोका, कोणी शौचालयात बसून केला प्रवास! रेल्वेत प्रवाशांची खचाखच गर्दी, Photo, Video व्हायरल

गर्दीने खचाखच भरलेल्या ब्रह्मपुत्रा मेलमध्ये एका प्रवाशाला झोका बांधून करावा लागतोय प्रवास!

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त प्रीमियम स्टोरी

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल आहे. त्या लोकलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांंनी प्रवास करावा, असे प्रवाशांंचे म्हणणे आहे.

mumbai, Central Railway, 28 Additional Summer Special Trains, Mumbai and Gorakhpur, 28 Additional trains, Additional Special trains, summer special trains, mumbai news,
मुंबई-गोरखपुर दरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

उन्हाळी हंगामात मुंबईहून उत्तरेला जाणाऱ्या अधिक रेल्वेगाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता मुंबई आणि गोरखपूरदरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे…

thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे कामानिमित्तने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असताना सोमवारी रात्री मुंब्रा येथील रेतीबंदर भागातील रेल्वे पूलावरून…

central railway started facility of providing cheap food to passengers at 100 stations
प्रवाशांना खुषखबर! रेल्वे देतेय स्वस्तात जेवण; जाणून घ्या कोणत्या स्थानकावर सुविधा… 

प्रवाशांना परवडणारे जेवण  २० रुपयांत दिले जात आहे. याचवेळी इतर खाद्यपदार्थ ५० रुपयांत दिले जातील.

Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर प्रीमियम स्टोरी

कल्याण ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.५४ वाजता सुटणाऱ्या अति जलद वातानुकूलन लोकलमधील ७०५२ सी या…

ltt thivim 3 hour late marathi news
मुंबई: प्रवाशांच्या गोंधळानंतर अखेर रेल्वेगाडी सुटली, एलटीटी-थिवी रेल्वेगाडी तब्बल तीन तास उशिरा

नुकताच डब्याअभावी एलटीटीवरून थिवीकडे जाणारी रेल्वेगाडी सोडण्यास तब्बल तीन तासांचा उशीर झाला. यात लहान मुले, वयोवृद्ध, महिला प्रवाशांचे प्रचंड हाल…

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु

टीटीई नक्की होणार कसे? याबाबत अनेकांना माहितीच नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टीटीई होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? याबाबत जाणून…

Congress Leader Rahul Gandhi slam modi government
 ‘रेल्वे वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे’ 

राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक चित्रफीत प्रसारित केली, ज्यामध्ये लोक शौचालय व ट्रेनमधील बर्थवर बसून सरकारवर टीका करत आहेत

संबंधित बातम्या