एखाद्या मुलीला मेसेज केल्यावर तिच्याकडून रिप्लाय न आल्याच्या प्रकार तुमच्याही बाबतीत अनेकदा घडला असेल. चांगल्या हेतूने मेसेज केला तरी समोरून रिप्लाय येत नाही. अशा वेळी मात्र मन अस्वस्थ होऊ लागते. आपल्या मेसेज करण्याचा तिने काही चुकीचा अर्थ घेतला का? असे राहून राहून अनेक मुलांना वाटते पण मुलाच्या मेसेला उत्तर न देण्यामागेही अनेक कारणे आहेत ही कारणे एका मुलाने समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.
अनोळखी क्रमांक किंवा अनोळखी अकाऊंट- मेसेजला पटकन रिप्लाय न देण्याचे कारण म्हणजे अनोळखी क्रमांक. अनोळखी क्रमांकावर रिप्लाय देणे म्हणजे स्व:ताहून पायावर कु-हाड मारून घेण्यासारखे आहे त्यामुळे शक्यतो कोणतीही मुलगी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजला रिप्लाय देणे टाळते. त्यामुळे मुलीला पाहिल्यांदा मेसेज करताना जोक्स किंवा इतर मेसेज करण्याआधी तुमची ओळख सांगा.
वाईट अनुभव – अनेकदा मुली त्यांच्या खाजगी आयुष्यात वाईट अनुभवांना सामोरे गेलेल्या असतात त्यामुळे यात पुन्हा त्यांना पडायचे नसते. अशा नाजूक मनस्थितीत मुली मुलांनाच काय पण मुलींनाही रिप्लाय देणे टाळतात.
प्रेमप्रकरण- तिसरे आणि सर्वसामान्य कारण म्हणजे प्रेमप्रकरण. अनेकदा मुलींनी दुस-या मुलाला कमिटमेंट दिलेली असते. अशा वेळी इतर मुलांना रिप्लाय करणे किंवा त्यांच्या सोबत संपर्क वाढवणे त्यांना गरजेचे वाटत नाही त्यामुळे त्या रिप्लाय देणे टाळतात.

चुकीचे मेसेज पाठवणे – फारसे संपर्कात नसतानाही मुलींना उगाचच मेसेज केलेले आवडत नाही. वायफळ मेसेज पाठवून मुलगा अधिक संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे गैरसमज कधीकधी मुलींना होतात त्यामुळे त्या रिप्लाय देणे टाळतात. पण बरेचदा मुलेही मेसेज करून मुलींना त्रास देतात त्यामुळे त्यांना रिप्लाय देण्याऐवजी त्या दुर्लक्ष करणे पसंत करतात.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Can you feed ducks bread
तुम्ही बदकांना ब्रेड खायला घालू शकता का? बदकांना काय खायला द्यावे, काय नाही?
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही