दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून जंगलात कारमध्ये कोंबून दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना सावनेरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अखिल महाविर भोंगे (२६, रा. पंदराखेडी, ता. सावनेर) आणि पवन विठ्ठलराव बासकवरे (२४, मानेगाव, ता. सावनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरही वाढीव प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा आदेश बेपत्ता!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्विटी(काल्पनिक नाव) ही सावनेरमधील एका विद्यालयात दहावीत शिकते. तिच्या वर्गमैत्रिणीचा आरोपी अखिल भोंगे हा प्रियकर होता. पवन बासकवरे त्याचा मित होता. २३ जानेवारीला सायंकाळी पवन आणि अखिल हे दोघेही स्वीटीला शाळेत भेटायला आले. स्विटीला कारमध्ये बसवून पवन आणि अखिलेशने कार नागपूर महामार्गाने घेतली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>>धक्कादायक! न्यायासाठी प्रजासत्ताक दिनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

अशी आली घटना उघडकीस
सामूहिक बलात्कारामुळे स्विटी रस्त्यावर बेशुद्ध पडली. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाला ती दिसली. त्याने तिला पाणी दिले आणि घरी सोडून देण्याबाबत विचारले. तिने सावनेर पोलीस ठाण्यापर्यंत सोडण्याची विनंती केली. ती पोलीस ठाण्यात पोहचली. तिने पोलिसांनी घडलेली प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.