‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला विनोदी अभिनेता कपिल शर्मा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. कपिल शर्माने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो चित्रपटांकडे का वळला आहे याबद्दल बोलला आहे.

२०१३ मध्ये आलेल्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या कार्यक्रमामुळे त्याची लोकप्रियता वाढत गेली. त्याच्या कार्यक्रमात बहुतांश कलाकार हे पुरुष असतात. ते कलाकार कधी कधी स्त्री पात्रदेखील रंगतात. यावरच कपिलने आजतकला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे तो असं म्हणाला, “आमच्या कार्यक्रमात खऱ्या मुलीचं नाहीत. मुलं आहेत तेच स्त्री पात्र रंगवतात. जेव्हा खऱ्या मुलींबरोबर काम केलं तेव्हा असं वाटलं आपण बराच वेळ कार्यक्रमावर घालवला आता आपण याकडे ( चित्रपटांकडे) वळूयात.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

त्नी आलिया भट्टच्या ‘या’ गोष्टीचा रणबीर कपूरला आहे तिटकारा; म्हणाला “ती बाथरूममधून….”

कपिलने काही विनोदी चित्रपटदेखील केले आहेत. मात्र आता तो ‘ज्विगाटो चित्रपटातून एका डिलीव्हरी बॉयचे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक होत आहे. हा चित्रपट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता.

कपिलच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले असून या चित्रपटात गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत. हा चित्रपट लावकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिलचे चाहतेदेखील चित्रपटाची वाट बघत आहेत.