scorecardresearch

आदित्य ठाकरे

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरे २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २३ जानेवारी २०१८ रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.

आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष होते, ज्याची स्थापना १७ ऑक्टोबर २०१० रोजी झाली होती आणि ती भारतातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय आहे. त्यांनी विविध विद्यार्थी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडला विरोध करताना पर्यावरणवाद्यांसह या आंदोलनात आदित्य खांद्याला खांदा लावून सहभागी होते. सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे सरकारने या कारशेडला स्थगिती दिली होती, जी नंतर एकनाथ शिंदे सरकारने उठवली व आरेमध्येच कारशेड बांधण्याचे नक्की केले.

आदित्य ठाकरे यांना कविता करायला आवडतात. त्यांनी मुंबईची स्वच्छता आणि हरित वाहतूक यासह संबंधित कारणांसाठी प्रचारक म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे. ते प्लॅस्टिक बंदीसाठी देखील जोर देत आहेत आणि मुंबईतील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहेत जे मुख्यत्वे त्यांच्या पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महापालिके अंतर्गत येते.


Read More
Iqbal singh chahal
इक्बालसिंग चहलांना आयुक्तपदावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट; म्हणाले, “प्रत्येक घोटाळ्याची…”

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईवरून आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on dynastic politics
‘सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादी आणि आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेत फूट’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

घराणेशाहीच्या राजकारणावर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे.

Maharashtra Government, Mandates Electric Vehicle, Purchase, government Officials, cm and governor, Excludes, High Court Judges,
‘यांना’ मिळाली इलेक्ट्रिक वाहन खरेदीपासून मुभा…’हे’ आहे विशेष कारण…

पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्युत वाहन धोरण २०२१ जाहीर केले होते. यात सर्व…

uddhav thackeray modi shah
“घराणेशाहीबद्दल बोलताय, मग आता होऊन जाऊ दे…”, उद्धव ठाकरेंचं भर सभेतून मोदी-शाहांना आव्हान

उद्धव ठाकरे यांना सामान्य शिवसैनिकाऐवजी त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असा आरोप अमित शाह आणि इतर भाजपा…

eknath shinde uddhav thackeray aaditya thackeray marathi news
“कद्रू वृत्तीचा माणूस…”, एकनाथ शिंदेंचं कोस्टल रोडवरून टीकास्र; म्हणाले, “पूर्वीच्या सरकारचा…”

एकनाथ शिंदे म्हणाले, “आज काही लोक म्हणतात की मी अमुक ठिकाणी उभा राहतो, नवा मतदारसंघ शोधतो वगैरे. पण ज्या लोकांनी…!”

sanjay raut aditya thackeray
“आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी…”, संजय राऊतांचं वक्तव्य; जय शाहांचा उल्लेख करत अमित शाहांवर पलटवार

संजय राऊत म्हणाले, आम्हाला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर आम्ही अमित शाहांना विचारायला जाणार नाही.

amit shah aditya thackeray
आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट? केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले, “राजकीय पथ्य पाळलं असतं…”

ठाकरे गटातील राजपुत्राचा उल्लेख करत दीपक केसरकर म्हणाले, मुळात आपण राजकीय निर्णय घेताना चुकायचं आणि नंतर मग नेत्यांच्या मागे जायचं,…

Anant Ambani Radhika Merchant pre wedding
Video : उद्धव ठाकरेंसह आदित्य अन् रश्मी ठाकरे पोहोचले जामनगरला, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी खास उपस्थिती

Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरला पोहोचले उद्धव ठाकरे, व्हिडीओ व्हायरल

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×