Spicy Ratalyache kaap : उपवासाला आपण सहसा साबुणादा खिचडी किंवा भगर खातो पण तु्म्ही साबुदाणा खिचडी किंवा भगर खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला रताळ्याची खास रेसिपी सांगणार आहोत. आजवर तुम्ही रताळ्याची पुरी, रताळ्याचा शिरा,रताळ्याचे वडे खाल्ले असेल पण तुम्ही कधी रताळ्याचे तिखट काप खाल्ले आहे का? रताळ्याचे तिखट काप चवीला अप्रतिम वाटतात. आज आपण रताळ्याचे तिखट काप कसे बनवायचे, हे जाणून घेणार आहोत. उपवासाला हा एक खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही एकदा खाल तर पु्न्हा पुन्हा खाल.लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना हा खास पदार्थ आवडेल. तुम्ही सुद्धा उपवासाला रताळ्याचे तिखट काप हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊ या.

महाशिवरात्रीला लोकं आवडीने रताळे खातात. पण आता महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही असे रताळ्याचे तिखट काप करू शकता. हे काप तुम्हाला खूप आवडेल. यंदा महाशिवरात्रीच्या उपवासाला ही रेसिपी नक्की करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्य

  • दोन रताळे
  • तूप
  • जिरे
  • लाल तिखट
  • मीठ
  • आल्याची पेस्ट
  • दाण्याचा कूट
  • बारीक चिरलेली मिरची

हेही वाचा :साबुदाण्याची कुरकुरीत भजी खाल्ली का? झटपट होणारी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरूवातीला दोन रताळे घ्या .
  • ही रताळे स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या आणि त्यानंतर त्यावरील साल काढून घ्या
  • रताळाच्या गोल अशा जाडसर चकत्या तयार करा.
  • त्यानंतर गॅसवर कढई ठेवा. त्यात तूप टाका
  • तूप गरम झाले की त्यात जिरे टाका
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची टाका आणि परतून घ्या
  • त्यानंतर रताळ्याचे काप त्यात टाका.चांगले परतून घ्या.
  • रताळे चांगले परतल्यानंतर त्यात लाल तिखट टाका आणि चवीनुसार मीठ टाका.
  • पुन्हा नीट परतून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवून घ्या.
  • रताळे शिजल्यानंतर त्यात आल्याची पेस्ट टाका आणि शेंगदाण्याचा कुट टाका आणि नीट परतून घ्या.
  • रताळ्याचे तिखट काप तयार होतात. हे तिखट काप तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता.
  • दह्याबरोबर रताळ्याचे तिखट काप अप्रतिम वाटतात.