शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई (Mumbai) मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.
२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. Read More
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात आदेश दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांकडून याप्रकरणी…