01 October 2020

News Flash

अखेर ‘निफ्टी’ने १०,१०० ची  पातळी राखली!

पुढील आठवडय़ात निर्देशांकांनी ३२,४०० / १०,१०० चा निर्णायक स्तर तर राखलाच पाहिजे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बाजार  । तं। त्र। क।ल।

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या लेखात एक महत्त्वाचा निर्देश होता. तो म्हणजे – बाजारात घसरण सुरू झाल्यामुळे सद्य:स्थितीत सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकावर अनुक्रमे ३२,४०० / १०,१०० ही ‘डू ऑर डाय’ अर्थात निर्णायक पातळी असेल. आणि सरलेल्या आठवडय़ात निर्देशांक हा स्तर राखण्यात यशस्वी ठरत असल्याचे नेमके आढळून आले. या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊया.

पुढील आठवडय़ात निर्देशांकांनी ३२,४०० / १०,१०० चा निर्णायक स्तर तर राखलाच पाहिजे. ही एक महत्त्वाची पूर्वअट आहे. तथापि, आता जी सुधारणा चालू आहे ती अल्पजीवी आहे? की निर्देशांकांनी तळ प्रस्थापित करून येणाऱ्या दिवसांत निर्देशांक अगोदरच्या अथवा नवीन उच्चांकाला गवसणी घालेल काय? हा मोलाचा प्रश्न आहे. या प्रश्नांच्या उत्तरासाठी निर्देशांकावर ३३,२०० / १०,२५० ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ असणार.

येणाऱ्या १५ दिवसांत (कामकाजाचे दिवस) ज्यात गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आणि ते बाजारानुकूल राहून किमतीत परावर्तित झाल्यानंतर निर्देशांक सातत्याने ३३,२०० / १०,२५० च्या स्तरावर राहायला हवा. तसा तो राहिला तर निर्देशांकांनी या आठवडय़ातील घसरणीत आपला नीचांक प्रस्थापित केला असे समजायला हरकत नाही. त्यापुढेच अगोदरचे अथवा नवीन उच्चांक दृष्टिपथात येतील. अन्यथा येणाऱ्या दिवसांत निर्देशांकाला ३३,२०० / १०,२५० चा स्तर ओलांडण्यात वारंवार अपयश येत असल्यास ही आता चालू असलेली सुधारणा ही अल्पजीवी (वीक बाऊन्स) असून निर्देशांक ३१,७५० / ९,९५० आणि नंतर ३१,१०० / ९,८५० ते ९,७५० पर्यंत खाली घसरू शकतो.

सोने किमतीचा आढावा :  २८,३०० पर्यंत घसरण शक्य

सोन्याच्या भावाने आपले वरचे उद्दिष्ट २९,६०० रुपये गाठून जी घसरण दाखविली ती आजतागायत सुरू आहे. किंबहुना, आता तर सोने मंदीच्या गत्रेत गेले आहे. परिणामी, २८,३०० रुपये हे सोन्याचे खालचे उद्दिष्ट असेल. २९,००० रुपयांवर सोने सातत्याने टिकल्यास सोने मंदीच्या गत्रेतून बाहेर येईल.  (सोन्याचे भाव ‘एमसीएक्स’वरील व्यवहारांवर आधारित)

शुक्रवारचा बंद  स्तर 

सेन्सेक्स       ३३,२५०.३०  निफ्टी      १०,२६५.६५

*  जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लि.

(बीएसई कोड ५३०३४३)   शुक्रवारचा भाव : रु. ७०.२५

लक्षवेधी समभाग..

जीनस पॉवरचा आजचा बाजारभाव २०० (४९), १०० (५६), ५० (६१), २० (६२) अशा सर्व दिवसांच्या चलत सरासरीवर बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ५५ ते ७३ रुपये असा आहे. समभागात ७३ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट ८५ ते १०० रुपये असेल आणि द्वितीय उद्दिष्ट १२० रुपये असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ५५ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

आशीष अरिवद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2017 2:51 am

Web Title: index possible move of major stocks for next week
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’ची पुन्हा त्रिशतकी झेप
2 कंपनी सुशासनासाठी अधिक तत्परतेने कार्य हवे
3 एअर इंडियाकडून आणखी १५०० कोटींची कर्जउभारणी
Just Now!
X